मुंबई : Cricket News : तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर आता भारतीय संघ केएल राहुलच्या नेतृत्वाखाली तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. पहिला एकदिवसीय सामना 19 जानेवारीला होणार आहे. रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत केएल राहुलसोबत कोण ओपनिंग करेल हा सर्वात मोठा प्रश्न आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार केएल राहुलसोबत ओपनिंग आघाडी हा खेळाडू करणार आहे. तो त्याच्या चांगल्या फलंदाजीसाठी ओळखला जातो.


 KL Rahulसोबत हा खेळाडू करणार डावाची सुरुवात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिखर धवन (Shikhar Dhawan) 35 वर्षांचा झाला असून तो अतिशय खराब फॉर्मशी झुंज देत आहे. त्याच्या बॅटमधून धावा काढणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) पहिल्या वनडेत केएल राहुल याच्यासह रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) सलामीला जाऊ शकतो. ऋतुराज आपल्या बॅटने जोरदार फटकेबाजी करु शकतो हे आपण आयपीएलमध्ये पाहिले आहे. रोहित शर्मा याच्यासारखी मोठी खेळी खेळण्यासाठी तो ओळखला जातो. प्रत्येक खेळी एकदम थरारक असते. कोणत्याही बॉलरचा तो चांगला सामना करु शकतो. ऋतुराजला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली तर तो धावांचा पाऊस पाडू शकतो.


आयपीएलमध्ये चांगली खेळी


ऋतुराज गायकवाडने IPL 2021 मध्ये आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत. त्याने CSK संघासाठी IPL 2021 ची ट्रॉफी स्वबळावर जिंकली आहे. ऋतुराजने आयपीएल 2021 च्या 16 सामन्यांमध्ये 636 धावा केल्या आणि तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. तो स्फोटक खेळाडू असल्याने समोरच्या संघाला धडकी बसते. तो उत्तुंग षटकार मारण्यासाठी ओळखला जातो. बऱ्याच अंशी ऋतुराज गायकवाडची फलंदाजी रोहित शर्मासारखीच आहे. त्याचा झंझावाती खेळ पाहून चेन्नई सुपर किंग्जने त्याला कायम ठेवले आहे.


सलामीची जोडी मजबूत  


केएल राहुल हा अतिशय उत्कृष्ट फलंदाज आहे. जर तो आपल्या लयीत असेल तर तो कोणत्याही गोलंदाजीची लय मोडून काढू शकतो. ऋतुराज गायकवाड त्याच्यासोबत मिळून टीम इंडियाला चांगली सुरुवात करुन देऊ शकतात. हे दोन्ही खेळाडू विकेटच्या दरम्यान खूप चांगले धावतात. पहिल्या एकदिवसीय सामन्यात या दोन्ही खेळाडूंची बॅट तलपली गेली, तर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची अवस्था कठिण होऊन जाईल.  


बुमराह उपकर्णधार


दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी केएल राहुलला कर्णधार आणि जसप्रीत बुमराहला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. अनेक दिग्गज खेळाडू संघात परतले आहेत. रविचंद्रन अश्विन, शिखर धवन आणि जयंत यादवचे पुनरागमन झाले आहे. या खेळाडूंमुळे भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत चमत्कार करु शकतो.


एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघ :


 केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन  (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, जयंत यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी.