नवी दिल्ली : क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कडून क्रिकेट शिकायला कोणाला नाही आवडणार ? प्रत्येक युवा क्रिकेटरची ही इच्छा असतेच.आतापर्यंत सचिनतर्फे अशी कोणतीही शिकवणणी सुरू नव्हती. आपण मिडिलसेक्स क्रिकेटशी जोडल्याची घोषणा सचिन बुधवारी करणार आहे. तेंडुलकर मिडिलसेक्स ग्लोबल अॅकेडसी (टीएमजीए) असंख्य क्रिकेटर्सचे स्वप्न पूर्ण करणार आहे.


खेळाडूंना स्कॉलरशीप 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीएमजीए एसआटी स्पोर्ट्स मॅनेजमेंट लिमिटेड आणि मिडिलसेक्स क्रिकेटचा हा संयुक्त उपक्रम असणार आहे. इंग्लंडच्या नार्थुवुड मके मर्चेंट टेलर्स स्कूलमध्ये येत्या ६ ते ९ ऑगस्टपासून याची सुरूवात होणार आहे. यानंतर सचिन मुंबई आणि लंडनमधील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्या अनुभवाचा फायदा देणार आहे. दिग्गज क्रिकेटर्सना घेऊन सचिनने या अॅकेडमीचा कोर्स तयार केलायं. या अॅकेडमीतून गुणी खेळाडूंना स्कॉलरशीपदेखील दिली जाणार आहे.


खेळाडू बनणार वैश्विक नागरिक 


एंड्रयू स्ट्रॉस, माइक गॅटिंग, डेनिस कामप्टन, जॉन एंबुरी, माइक ब्रेयर्ले असे दिग्गज खेळाडू मिडिलसेक्स क्रिकेटमधून शिकून बाहेर पडले आहेत. मला मिडिलसेक्ससोबत काम करून आनंद होत असल्याचे सचिनने सांगितले.  अॅकेडमीचा उद्देश केवळ चांगले खेळाडू बनविणे हाच नसून वैश्विक नागरिक बनविण्याचा देखील असल्याचे यावेळी त्याने सांगितले.


खेळाडुंना फायदा 


गेल्या सहा महिन्यात आम्हाला सचिनसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि आम्ही जगातील बेस्ट प्रोग्राम तयार करु शकलो हे आमचं भाग्य असल्याचे मिडिलसेक्सचे सीईओ रिचर्ड गोटले यांनी सांगितले. सचिनला देशातील सर्वच मैदानात खेळण्याचा अनुभव असल्याने याचा फायदा शिकणाऱ्या खेळाडुंनाा नक्की होणार असल्याचे म्हटले जात आहे.