नवी दिल्ली : एकेकाळी ऑस्ट्रेलिया जशी क्रिकेटच्या फॉर्मेटमध्ये अव्वल होती त्याप्रमाणे टीम इंडियाही होताना दिसत आहे.  टेस्ट आणि वनडे क्रिकेटमध्ये टीम इंडिया नंबर वन बनली आहे. टीमचे बहुतांश खेळाडू सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत.ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कॅप्टन कोहलीची बॅट फारशी तळपलेली नसली तरी तो कधीही फॉर्ममध्ये येऊन विरोधकांसोर मोठे आव्हान निर्माण करु शकतो. सध्या कोहलीसमोर टी २० मध्येही टीम इंडियाला नंबर आणण्याचे नवे चॅलेंज आहे. आपल्या टीमला टी २० मध्येही नंबर वन आणून इतिहास रचणार असल्याचा कोहलीला विश्वास आहे. 
स्टार स्पोर्ट्सने नुकतीच एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.



या व्हिडीओमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली मेहनत करताना दिसत आहे. कोहली सकाळी ५ वाजता उठून कठोर परिश्रम घेतो. जिम आणि नेट्सवर मेहनत घेऊन घाम गाळतो असेही या व्हिडिओमध्ये दिसत असून त्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळत असल्याचेही यात दाखविण्यात आले आहे.
जेव्हा विराट २२ वर्षाचा असताना टीम इंडियाने विश्वचषक जिंकला होता. एवढेच नव्हे तर त्याने अंडर १९ संघाचे नेतृत्व करत भारताला विश्व चॅम्पियन बनविले.  भारतीय संघात आल्यानंतर ते चार वेळा कसोटी क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार बनला. कोहलीला सर्व परिस्थितीमध्ये चांगला खेळ करुन रेकॉर्ड मोडतो असेही यात दाखविण्यात आले आहे.
आपण कठोर परिश्रम करता तेव्हा त्यावर विश्वास ठेवायला हवा असा संदेश या व्हिडिओच्या शेवटी कोहली देतो. विश्वास ठेवा असे त्याने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे.
 भारतीय संघ सध्या आयसीसी टी -२०  क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे आणि जर टीम इंडिया पुढील दोन सामन्यात जिंकल्यास क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचणार आहे. टी २० मध्येही प्रथम क्रमांकावर आल्यास टीम इंडिया इतिहासात पहिल्यांदाच तिनही फॉर्मेटमध्ये अव्वल राहणार आहे.