नवी दिल्ली : इंग्लंडच्या टीमचे जगजेत्ते बनण्याचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. लॉर्ड्स मैदानावर नाट्यमय अंदाजात त्यांचे स्वप्न 44 वर्षांनी पूर्ण झाले. इंग्लंडने न्यूझीलंडला सुपर ओव्हरमध्ये मात देत इतिहास रचला. तिकडे मॅच सुरु असताना एक महिलेने प्रेक्षकांचे लक्ष स्वत:कडे खेचून घेण्याचा प्रयत्न केला. काळ्या रंगाचा स्वीमसूट घातलेली एक महीला दर्शकांमध्ये होती. अचानक ती मैदानाच्या दिशेने धावू लागली आणि आपल्या अंगावरील कपडे उतरवण्याचा प्रयत्न करु लागली. तिच्या कपड्यांवर 'विटवी अनसेंसर्ड' असे लिहिले होते. पण मैदानात उपस्थित असलेल्या सुरक्षाकर्मींनी तिची डाळ शिजू दिली नाही. ती पुढे काही कृत्य करण्याआधीच सुरक्षाकर्मींनी तिला ताब्यात घेतले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


या महिलेचे नाव ऐलेने वुलिट्स्की असे असल्याचे सांगण्यात येत आहे.



ती आपला मुलगा विटली डेरोवेट्सकी या एडल्ट वेबसाईटचे प्रमोशन करते. विटाली डोरोवेट्सकी एक एक्स रेटेड पॉर्न प्रॅंकिंग वेबसाईटचा मालक आहे.



आईच्या या प्रयत्नांवर मुलगा विटलीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझी आई खरोखर वेडी आहे आहे असे त्याने ट्वीटमध्ये म्हटले आहे. याआधी लिवरपूल आणि टोटेनहम दरम्यान खेळवल्या गेलेल्या यूईएफए चॅम्पियन्स लीगच्या फायनलमध्ये विटलीच्या गर्लफ्रेंड किन्से वोलांसकीने देखील अशाप्रकारे एडल्ड वेबसाईटचा प्रचार केला होता.