वेलिंग्टन :  टीम इंडिया (Team India) आणि न्यूझीलंडचं (New Zealand) टी 20 वर्ल्ड कपमधील (T 20 World Cup 2022) आव्हान सेमी फायनलमध्ये संपुष्टात आलं. त्यानंतर आता हे दोन्ही संघ टी 20 आणि त्यानंतर वनडे सीरिजमध्ये आमनेसामने भिडणार आहेत. टी 20 सीरिजमधील पहिला सामना 18 नोव्हेंबरला वेलिंग्टनमध्ये (NZ vs IND) खेळवण्यात येणार आहे. या दोन्ही सीरिजमध्ये टीम इंडियाच्या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलसारख्या अनुभवींना विश्रांती दिली आहे. त्यामुळे अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थिती टीम इंडियाची बॅटिंग ऑर्डरबाबत विशेष करुन ओपनिंगबाबत चर्चा सुरु झाली आहे. (nz vs ind team india rishabh pant ishan kishan deepak hodda and sanju samson is strong contender for opening against new zealand t 20 series)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी 20 सीरिजमध्ये ओपनिंग जोडी कोण असणार, या प्रश्नाचं उत्तर कॅप्टन हार्दिक पंड्या आणि कोच व्ही व्ही एस लक्ष्मणला शोधायचं आहे. 


ऋषभ पंत ओपनिंग करणार? 


ऋषभ पंत टी 20 सीरिजमध्ये उपकर्णधार आहे. तसेच पंतला ओपनिंगला पाठवा, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. पंतला इंग्लंड विरुद्ध ओपनिंगची संधी मिळाली होती. मात्र तेव्हा पंतलाविशेष असं काही करता आलं नाही.  पंत कारकिर्दीच्या सुरुवातीला ओपनर होता. त्यामुळे पंत ओपनिंगसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. 


हे तिघेही चर्चेत


पंतशिवाय संजू सॅमसन, इशान किशन आणि दीपक हुड्डा या तिघांची ओपनिंगसाठी चर्चा आहे. इशानने याआधी अनेकदा ओपनिंग केली आहे. तर दीपक हुड्डाही ओपनिंगसाठी प्रबळ दावेदार आहे. तसेच संजू सॅमसनही चांगली कामगिरी करतोय. त्यामुळे या टी 20 सीरिजमध्ये नक्कीच नवी ओपनिंग जोडी पहायला मिळेल, हे मात्र नक्कीच.  


टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया


हार्दिक पंड्या (कॅप्टन), ऋषभ पंत (उपकर्णधार/ विकेटकीपर), शुबमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक.