India vs Bharat : भाजपचे खासदार नरेश बन्सल यांनी काही दिवसांपूर्वी  संविधानात इंडियाऐवजी (India) भारत (Bharat) नाव करण्याची मागणी राज्यसभेत केली होती.. त्यानंतर काहीच दिवसात इंडियाऐवजी भारत असा उल्लेख राष्ट्रपतींच्या निमंत्रणपत्रिकेवर करण्यात आल्यानं राजकारण तापलंय. तर सरसंघचालक मोहन भागवतांनीही यापूर्वीच इंडियाऐवजी भारत असा उल्लेख झाला पाहिजे अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे भारत नाव करण्याची मागणी पुन्हा जोर धरु लागलीय..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वीरेंद्र सेहवागचं ट्विट चर्चेत
यादरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने (Virendra Sehwag) केलेलं एक ट्विट चांगलंच चर्चेत आलंय. सेहवागने ट्विट करत बीरीसीआय सचिव जय शाह (Jay Shah) यांच्याकडे एर मागणी केली आहे. पुढच्याच महिन्यात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा (ODI WC 2023) खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचं नाव बदललं जावं असं सेहवगाने म्हटलं आहे. स्पर्धेत टीम इंडिया ऐवजी भारत या नावाने मैदानात उतरावं असं सेहवागने ट्विट करत मागणी केली आहे.  ट्विटमध्ये सेहवागने पुढे म्हटलंय. मला नेहमीच विश्वास आहे की नाव असे असावे की ते आपल्यामध्ये अभिमान जागृत करेल. आपण भारतीय आहोत आणि इंडिया हे नाव ब्रिटिशांनी दिलं आहे. त्यामुळे इंडियाचं नाव बदललं गेलं पाहिजे.


एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या जर्सीवरही भारत असं लिहिण्यात यावं अशी मागणीही सेहवागने आपल्या ट्विटमध्ये केली आहे. 


इंडियाचं नाव अधिकृतरित्या भारत करण्यात यावं अशा जोरदार चर्चा रंगल्या असतानाच सेहवागचं ट्विट आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. देशाचं इंडिया हे नाव बदलल्यास इंग्रजीत भारत असंच लिहिण्यात येईल. सेहवगाने नेपाळविरुद्धच्या सामन्यात इंडिया वि.नेपाळ ऐवजी भारत वि.नेपाळ अशा हॅशटॅगचा वापर केला होता. 



या संघांची नावं बदलली आहेत
आंतरराष्ट्रीय क्रिकट संघाचं नाव बदललण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी नेदरलँड संघाचं नावही बदलण्यात आलं होतं. हा संघ आधी हॉलंड नावाने मैदानात उतरत होता. पण एक जानेवारी 2020 मध्ये या देशाने अधिकृतरित्या नेदरलँड नाव करुन घेतलं. सेहवगाने आपल्या ट्विटमध्ये नेदरलँड देशाचं उदाहरम दिलं आहे. सेहवगाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. 1996 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत नेदरलँडचा संघ टीम हॉलंडच्या नावाने खेळली, पण 2003 मध्ये टीम नेदरलँडच्या नावावर मैदानात उतरली. याशिवाय बर्मा देशाने आपलं नाव बदलून म्यांमार केलं आहे.