Team India Squad for ODI WC 2023 : पाकिस्तान आणि श्रीलंकेत सध्या एशिया कप सर्धा (Asia Cup 2023) सुरु आहे. भारताने नेपाळचा धुव्वा उडवत सुपर-4 मध्ये प्रवेश केला आहे. एशिया कप नंतर बरोबर एक महिन्याने एकदिवसीय विश्वचषक सर्धा खेळवली जाणार आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने (BCCI) 15 खेळाडूंच्या संघाची (Team India Squad) घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली निवडण्यात आलेल्या या संघात फारसे आश्चर्यकारक बदल करण्यात आलेले नाहीत. एशिया कप स्पर्धेसाठी खेळणारा संघच एकदिवसीय विश्वचषकासाठी निवडण्यात आला आहे. आता क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती टीम इंडियाची सर्वोत्तम प्लेईंग XI कशी असणार. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्लेईंग इलेव्हनेचा अवघड निर्णय
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत एकूण 10 संघांचा सहभाग आहे. टीम इंडियाच्या 'मिशन वर्ल्ड कप'ची सुरुवात 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रलियाविरुद्धच्या सामन्याने होईल. त्यानंतर 11 ऑक्टोबरला अफगाणिस्तानविरुद्ध टीम इंडिया दुसरा सामना खेळेल. हा सामना दिल्लीला रंगणार आहे. टीम इंडिया एकूण साखळीत नऊ सामने खेळणार असून हे सर्व सामने वेगवेगळ्या मैदानावर रंगणार आहेत. त्यामुळे स्वाभाविकच खेळपट्टीनुसार टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. 


प्लेईंग 11 वर रोहित शर्मा काय बोलला?
एकदिवसीय विश्वचषकाची घोषणा झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वोत्तम प्लेईंग इलेव्हनवर प्रतिक्रिया दिली. प्रत्येक सामन्यात अकरा खेळाडू तेच असतील असं नाही, संघात बदल होत राहतील. खेळाडूंचा फॉर्म आणि विरोधी संघाची ताकद पाहून सामन्यात प्लेईंग इलेव्हनची निवड केली जाईल असं रोहित शर्माने म्हटलं आहे. 


केएल राहुल की ईशान किशन?
दुखापतीतून सावरल्यानंतर केएल राहुलचा (KL Rahul) टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. एशिया कप आणि विश्वचषक स्पर्धेसाठीच्या संघात केएल राहुलला संधी देण्यात आली आहे. पण एशिया कप स्पर्धेत पहिल्या दोन सामन्यात केएल राहुल खेळू शकला नाही. अशात विकेटकिपर-फलंदाज म्हणून ईशान किशनला (Ishan Kishan) संधी देण्यात आली. ईशान किशनने संघीचं सोनं करत पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात 82 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या खेळीमुळे ईशान किशनने संघात आपलं स्थान मजबूत केलं आहे. टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांच्या मते एका जागेसाठी दोन खेळाडूंमध्ये स्पर्धा असणं चांगली गोष्ट आहे. 


नंबर चारवर केएल राहुलने टीम इंडियासाठी चांगली कामगिरी केली आहे, त्याच्या परतण्याने टीम इंडियाला आधार मिळाला आहे. अनुभवाच्या आधारावर विश्वचषक स्पर्धेत के एल राहुलची निवड केली जाणार हे जवळपास निश्चित आहे. पण त्यामुळे ईशान किशनच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. 


गोलंदाजीतही आव्हान
विकेटकिपर फलंदाजीबरोबरच टीम इंडियात गोलंदाज निवडीवरुनही आव्हान असणार आहे. टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहचं स्थान निश्चित आहे. उर्वरीत मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांच्यातून दोघांची निवड करावी लागणार आहे. फिरगी गोलंदाज म्हणून अक्षर पटेलची वर्णी लागण्याची शक्यता आहे. 


भारताची संभाव्य प्लेइंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह