Hockey team into the semis : भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करत गोल्ड मेडलच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. क्वार्टर फायनलमध्ये भारतीय संघाने तगड्या ग्रेट ब्रिटनचा पराभव केला. भारताने शूट-आऊटमध्ये ग्रेट ब्रिटनचा 4-2 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पूर्णवेळ सामना झाल्यानंतर देखील १-१ अशी बरोबरी होती. त्यानंतर सामन्याचा निर्णय पेनल्टी शूटआऊटमध्ये झाला, अन् भारतीय स्ट्राईकर्सने 4 सगळ गोल करत सामना खिशात घातला. त्यामुळे आता भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. त्यामुळे आता भारताचं पदक निश्चित होताना दिसत आहे. (Indian men's hockey at Paris Olympics)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रेट ब्रिटनला 11व्या मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण भारताने गोल करू दिला नाही. ग्रेट ब्रिटनने खेळाला आक्रमक सुरुवात केली. पहिल्या क्वार्टरच्या अखेरीस भारताला तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण एकही गोल करण्यात अपयश आलं. ग्रेट ब्रिटनलाही तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे सामना अधिक रोमांचक झाल्याचं दिसून आलं. अशातच सामना सुरू असताना अमित रोहिदास याला रेड कार्ड मिळाला आणि भारतीय खेळाडू प्रेशरमध्ये आले. भारतीय संघाला आता 10 खेळाडूंसोबत मैदानात खेळावं लागणार होतं. 


कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत पहिला गोल केला. सामन्याच्या 22व्या मिनिटाला भारतीय कर्णधाराने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. हरमनप्रीत कौरने ऑलिम्पिकमध्ये 7 वा गोल करत भारताला मोठा दिलासा दिला. तर सामन्याच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये ग्रेट ब्रिटनच्या केली मॉर्टनने 27 व्या मिनिटाला गोल केला आणि ब्रिटनला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली. सामना आता रंगतदार स्थितीत आला होता. तर दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताच्या बचावात सलग दोन गोल वाचवून श्रीजेशने मोठं संकट सावरलं. त्यामुळे चौथ्या क्वार्टरपर्यंत सामना बरोबरीत झाल्याने निकाल शुटआऊटने झाला.



शुटआऊटमध्ये काय झालं?


ग्रेट ब्रिटनकडून जेम्स अल्बेरीने गोल केला. त्याला उत्तर देत कर्णधार हरमनीत प्रीतने पेनल्टी शूट-आऊटमध्ये गोल केला. जॅक वॉलरने ब्रिटनसाठी दुसरा गोल केला. त्यानंतर सुखजित सिंगनेही गोल केला केला अन् स्कोर 2-2 असा झाला, सर्वांच्या हृदयाचे ठोके चुकत होते. त्यानंतर कॉनर विल्यमसनचा गोल चुकला अन् भारताला मोठी संधी मिळाली. भारतासाठी ललित कुमार उपाध्यायचा गोल गेमचेंजर ठरला. भारत आता 3-2 ने पुढे होता. अखेर भारताने शूटआऊटमध्ये ग्रेट ब्रिटनचा 4-2 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.