Virat Kohli | विराट कोहलीच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा वर्ल्ड कप विजय
टीम इंडियाने पहिले बॅटिंग करताना 159 धावा केल्या. मात्र टीम इंडियाच्या भेदक बॉलिंगसमोर आफ्रिकेचा 103 धावांवर बाजार उठला.
मुंबई : विराट कोहलीकडून (Virat Kohli) तिन्ही फॉर्मेटमधील कॅप्टन्सी काढून घेण्यात आली आहे. विराटला आपल्या कॅप्टन्सीत टीम इंडियाला एकही आयसीसी ट्रॉपी जिंकून देता आली नाही, अशी टीका त्याच्यावर करण्यात आली. मात्र विराटने आपल्या कॅप्टन्सीत टीम इंडियाला एकदाही वर्ल्ड कप मिळवून दिला नाही, हे साफ खोटं आहे. (on this day 2 march team india beat south africa and win under 19 world cup 2008 in virat kohli captaincy)
विराटने आपल्या कॅप्टन्सीत टीम इंडियाला आजच्याच दिवशी (2 मार्च) 14 वर्षांपूर्वी अंडर 19 वर्ल्ड कप (Under-19 World Cup) जिंकून दिला होता. टीम इंडियाने 2008 मध्ये अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत वर्ल्ड कप जिंकला होता.
टीम इंडियाने पहिले बॅटिंग करताना 159 धावा केल्या. मात्र टीम इंडियाच्या भेदक बॉलिंगसमोर आफ्रिकेचा 103 धावांवर बाजार उठला. जाडेजाने या सामन्यात 2 विकेट्स घेतल्या होत्या. आज हे दोन्ही स्टार खेळाडू टीम इंडियाच्या सिनिअर टीमचे भाग आहे.
सामन्याचा धावता आढावा
आफ्रिकेने टॉस जिंकला. टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडिया निर्धारित 50 ओव्हर आधीच ऑल आऊट झाली. टीम इंडियाने 45.4 ओव्हरमध्ये ऑल आऊट 159 धावा केल्या.
टीम इंडियाकडून तन्मनय श्रीवास्तवने सर्वाधिक 74 चेंडूंमध्ये 4 फोर आणि 1 सिक्ससह 46 धावा केल्या. तर विराट कोहली, सौरभ तिवारी, मनिष पांडे आणि रवींद्र जाडेजा या चौकडीने अनुक्रमे 19, 20, 20 आणि 11 धावांचं योगदान दिलं होतं.
पावसाने खेळ बिघडवला
या महत्त्वाच्या सामन्यात पावसाने हजेरी लावली. पावसाच्या व्यत्ययामुळे काही वेळ वाया गेला. त्यामुळे नवीन टार्गेट देण्यात आलं. त्यामुळे आफ्रिकेला 25 ओव्हरमध्ये 116 धावांचं टार्गेट मिळालं. मात्र आफ्रिकेला 8 विकेट्स गमावून 103 धावाच करता आल्या.
आफ्रिकेकडून रिजा हेंड्रिग्सने सर्वाधिक 35 धावांची खेळी केली. याशिवाय वेन पार्नेल 29 रन्स केल्या. विशेष म्हणजे 6 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
टीम इंडियाकडून रवींद्र जाडेजाने 5 ओव्हरमध्ये 26 धावा देत 2 विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय अजितेश अर्गल आणि सिध्दार्थ कौलने प्रत्येकी 2 फलंदाजाना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
7 धावा देत 2 विकेट्स घेणारा अजितेश मॅन ऑफ द मॅच ठरला. अशा प्रकारे टीम इंडिया विराटच्या नेतृत्वात वर्ल्ड चॅम्पियन ठरली.
विराटने सिनिअर टीम इंडियाला आपल्या कॅप्टन्सीत अनेक विजय मिळवून दिले. मात्र त्याला एकदाही वर्ल्ड कप जिंकून देता आला नाही.