नवी दिल्ली : भारताचा स्टार स्पिनर अश्विनने क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा  निर्णय़ घेतलाय. मात्र तो लगेचच निवृत्ती घेणार नाहीये तर कसोटी क्रिकेटमध्ये ६१८ बळी घेतल्यानंतर तो क्रिकेटला रामराम करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा मान अनिल कुंबळेंच्या नावार आहे. त्यांनी ६१९ विकेट घेतल्या. त्यामुळे अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये ६१८ विकेट घेतल्यानंतर निवृत्त होणार आहे. स्वत: अश्विनने ही माहिती दिलीये. 


अनिल कुंबळेंचा रेकॉर्ड मोडण्याबाबत अश्विनला विचारले असता तो म्हणाला, मी कुंबळेंचा चाहता आहे. त्यांनी ६१९ विकेट घेतल्या आणि जेव्हा माझ्या ६१८ विकेट होतील तेव्हा मी निवृत्त होईन. 


अश्विनने आतापर्यंत ५२ कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलंय. यात त्याने २५.२६च्या सरासरीने २९२ विकेट घेतल्यात. अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. अनिल कुंबळे(६१९), कपिल देव(४३४), हरभजन सिंग(४१७), झहीर खान(३११) त्यानंतर अश्विनचा नंबर लागतो.