VIDEO : सचिन ओपनिंगला येतो तेव्हा...
क्रिकेटचा देव म्हणवल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरसाठी २७ मार्च हा दिवस खास आहे.
मुंबई : क्रिकेटचा देव म्हणवल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरसाठी २७ मार्च हा दिवस खास आहे. २७ मार्च १९९४पर्यंत सचिन तेंडुलकर टीम इंडियासाठी मधल्या फळीत फलंदाजी करत होता. तोपर्यंत सचिनला मास्टर ब्लास्टर ही पदवीही मिळाली नव्हती. तसेच तोपर्यंत सचिन तितकासा प्रसिद्धही झाला नव्हता. त्यावेळी भारतासाठी अजय जडेजा, संजय मांजरेकर आणि नवज्योत सिंग सिद्धू ओपनिंग करायचे.
१९९४मध्ये टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर होती. १९ ते २३ मार्च पर्यंत मालिका खेळवण्यात आली होती. पहिला सामना २५ मार्चला नेपियरमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात न्यूझीलंडचा संघ २८ धावांनी जिंकला. दुसरा सामना २७ मार्चला ऑकलंडला खेळवण्यात आला. मात्र सामन्याआधीच सलामीचा फलंदाज नवज्योत सिंग सिद्धूला अनफिट घोषित करण्यात आला. त्यामुळे सलामीला कोण येईल हा प्रश्न टीम इंडियासमोर आला.
यावेळी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीने धक्कादायक निर्णय घेतला. अजय जडेजासह सचिनला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना १४२ धावा केल्या. त्यानंतर भारताच्या डावास सुरुवात झाली. अजय आणि सचिन मैदानात उतरले. अजय लवकर बाद झाला. मात्र सचिन मैदानात टिकून होता. त्याने ४९ चेंडूत ८२ धावांची धमाकेदार खेळी करताना भारताला विजय मिळवून दिला. सचिनने या डावात १५ चौकार आणि २ षटकार ठोकले. तिसऱ्या सामन्यातही सचिन पुन्हा ओपनिंगला उतरला आणि त्याने ६३ धावांची खेळी केली.
असा बदलला क्रिकेटचा इतिहास
याच घटनेनंतर क्रिकेटचा इतिहास बदलला असे म्हणायला हरकत नाही. क्रिकेटच्या जगात वरच्या क्रमांकावर सचिनचे असे रुप पाहिले ज्याची प्रतीक्षा अख्ख क्रिकेट जगत करत होतं. सचिनने फलंदाजीत नवा इतिहास रचला. १९९४मध्ये त्याने पहिले वनडे शतक ठोकले. १९९८मध्ये त्याने वनडेमझ्ये सर्वाधिक शतकांचे डेसमंड हँस यांचा रेकॉर्ड तोडला.
वनडे क्रिकेटमध्ये सचिनने ४८.२९च्या सरासरीने ३४४ सामन्याच १५३१० धावा केल्या. त्याने ४९ वनडे शतकांमध्ये त्याने ४५ शतके सलामी फलंदाज म्हणून ठोकलीयेत.