इंदूर : टीम इंडियाने सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्याही मालिकाही खिशात घातलीये. मालिकेतील दोन सामने अद्याप आहेत. मात्र तुम्हाला माहीत आहे का तिसऱ्या वनडेत विजयाचे शिल्पकार कोहली वा पांड्या नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही बोलतोय टीम इंडियाचे कोच रवी शास्त्रीबद्दल. रवी शास्त्रींच्या एका निर्णयामुळे टीम इंडिया या सामन्यात विजय मिळवू शकली. चेन्नई वनडेत पांड्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता. त्या सामन्यात त्याने ८३ धावा करताना दोन विकेट मिळवल्या होत्या.


तिसऱ्या सामन्यात चौथ्या नंबरवर खेळवण्याचा निर्णय शास्त्रींनी घेतला आणि त्याचा परिणाम सामन्यावर दिसला. पांड्याच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला पाच विकेट्स राखून हरवले. 


ज्यावेळी रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर मनीष पांडे खेळण्यासाठी उतरणार होता. तेव्हा रवी शास्त्रींनी पांडेला न पाठवता हार्दिकला मैदानावर पाठवण्याचा निर्णय़ घेतला आणि हा निर्णय योग्य ठरला. पांड्याने केवळ विराटला साथच दिली नाही तर ७८ धावांची दमदार खेळी केली.