मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आज दोन नवे संघ भिडणार आहेत. गुजरात विरुद्ध लखनऊ सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. या सामन्यात आयपीएलमधील दोन्ही नव्या टीम पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातचं नेतृत्व हार्दिक पांड्या करत आहे. तर लखनऊ संघाचं नेतृत्व के एल राहुलकडे आहे. या सामन्या दरम्यान हार्दिक पांड्याला आपल्या नावावर अनोखा रेकॉर्ड करून घेण्याची संधी आहे. पांड्या जर चांगल्या फॉर्ममध्ये खेळला आणि त्याने षटकार ठोकला तर त्याच्या नावावर षटकारांचं शतक ठोकण्याचा विक्रम नोंदवण्यात येईल.


हा विक्रम करणारा हार्दिक पांड्या पहिला खेळाडू नाही. परंतु जगभरातील 25 खेळाडूंच्या यादीमध्ये त्याचं नाव जोडलं जाईल. यामध्ये 15 भारतीयांचा समावेश आहे. षटकारांचं शतक ठोकणारा हार्दिक पांड्या 16 वा भारतीय खेळाडू ठरू शकतो. 


आयपीएलमध्ये सर्वात जास्त षटकार ठोकण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा खेळाडू ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 142 सामन्यात 357 शतक ठोकले आहेत. भारतीय खेळाडूंमध्ये रोहित शर्मा पहिल्या स्थानावर आहे. त्याने 214 सामन्यांमध्ये 229 षटकार ठोकले आहेत. 


हार्दिक पांड्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 92 सामने खेळले आहेत. त्यामध्ये 1476 धावा तर 4 अर्धशतक त्याच्या नावावर आहेत. 97 चौकार आणि 98 षटकार ठोकले आहेत. आता त्याला षटकारांचं शतक ठोकण्यासाठी फक्त 2 षटकार आवश्यक आहेत. आजच्या सामन्यात पांड्या ही संधी सोडणार नाही अशी आशा आहे.