Hanuma Vihari: देशांतर्गत रणजी ट्रॉफीचे सामने सुरु असून आंध्र प्रदेशाच्या टीममध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. आंध्र प्रदेशाच्या टीमचा कर्णधार हनुमा विहारीने एक मोठा निर्णय घेतला. या सिझनमध्ये आंध्र प्रदेशाच्या टीमचं नेतृत्व विहारीने नाकारलं आहे. दरम्यान आंध्र क्रिकेट असोसिएशनने त्याच्याविरोधात चौकशी सुरू करण्याची घोषणा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएनने एक प्रेस रिलीझ जाहीर केलंय. यामध्ये असोसिएशनने लिहिलंय की, राज्य संघटनेने हनुमा विहारी विरुद्ध तपास सुरू केला आहे. विहारीने सुरु असलेल्या सिझनमध्ये सुरुवातीला कर्णधारपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडल्याचा ACA वर आरोप केला होता.


ACA ने जाहीर केलं प्रेस रिलीज


हनुमा विहारीच्या आरोपांनंतर, आंध्र क्रिकेट असोसिएशनने एक प्रेस रिलीज जारी केलंय. या प्रेस रिलीजमध्ये नमूद केल्यानुसार, 'विहारी यांच्याकडून असभ्य भाषा आणि अपमानास्पद वागणूक वापरल्याबद्दल टीममेट, सपोर्ट स्टाफ आणि ACA प्रशासकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. आंध्र क्रिकेट असोसिएशन सर्व तक्रारींची सखोल चौकशी करेल आणि योग्य ती कारवाई केली जाईल.


दरम्यान हे पत्र विहारीने स्वतः ट्विट केलं असून त्याला, Keep trying!!, असं कॅप्शन देखील दिलं आहे. 


हनुमा विहारीने काय केली होती पोस्ट?


सध्या मी ही पोस्ट मुद्दामहून लिहीतोय. गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा सुरू होत्या. पण नेमकं काय झालं? याबाबत मला तथ्य मांडायचं आहे. आंध्र प्रदेशकडून खेळताना बंगालविरुद्ध पहिल्या सामन्यात मी कॅप्टन होतो, त्या सामन्यात जेव्हा मी 17 व्या एका खेळाडूला ओरडलो आणि त्यानंतर त्या खेळाडूच्या वडिलांनी, जे राजकीय व्यक्ती आहेत, त्यांच्याकडे तक्रार केली होती. त्याच्या वडिलांनी माझ्यावर कारवाई करण्यास असोशिएशनला सांगितलं. आम्ही बंगालविरुद्ध यशस्वी पाठलाग केल्यानंतर देखील मला राजीनामा देण्यास सांगण्यात आलं होतं, असा खुलासा हनुमा विहारीने केला आहे.


माझी चूक नसताना देखील मला राजीनामा देण्यास सांगण्यात आलं. मात्र, कोणत्याही खेळाडूवर वयक्तीक टीका केली नव्हती. गेल्या 7 वर्षांपासून मी क्रिकेट खेळतोय, आंध्र प्रदेशला 5 वेळा बाद फेरीत नेलंय तर टीम इंडियासाठी 16 कसोटी खेळल्या आहेत. या कालावधीत मी कोणत्याच खेळाडूवर उगाच चिडलेलो नाही, असं मी कधीही करणार नाही, असं हनुमा विहारीने म्हटलं आहे. 


विहारी पुढे म्हणाला की, मला आंध्र प्रदेश संघासोबत खेळण्याची लाज वाटते. मात्र, या हंगामात खेळण्याचं एकमेव कारण म्हणजे मी या संघाचा आदर करतो. मला एका गोष्टीचा खेद वाटतो की, असोशिएशनला असं वाटतं की, सर्व खेळाडूंनी त्यांचं ऐकावं, पण हा संघिक खेळ आहे. मला खूप अपमानित झाल्यासारखं वाटतंय. मी माझी खंत आजपर्यंत बोलून दाखवली नाही. मी आता ठरवलंय की, मी आंध्रप्रदेशसाठी खेळणार नाही.