David Warner: OUT की NOT-OUT, वॉर्नरच्या कॅचवरून मोठा वाद; पाहा क्रिकेटचा नियम काय सांगतो?
David Warner: वॉर्नरने तुफान फलंदाजी करत शतकचं ठोकलं. मात्र त्यामुळे आता डेर मर्वेचा हा झेल वादात सापडला असून अनेक लोकं याविषयी विविध दावे करतायत. अशा परिस्थितीत आयसीसीचे नियम काय म्हणतात हे जाणून घेऊया.
David Warner: बुधवारी ऑस्ट्रेलिया विरूद्ध नेदरलँड्स यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी डच गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. यावेळी ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेविड वॉर्नरने 93 बॉल्समध्ये 104 रन्सची खेळी केली. मात्र या सामन्यामध्ये एक अशी गोष्ट घडली, ज्यामुळे एक नवा वाद निर्माण झाला. या सामन्यात नेदरलँड्सच्या खेळाडूने घेतलेला एक कॅच वादाचं कारण ठरला.
नेदरलँडचा खेळाडू व्हॅन डर मर्वेने वॉर्नरचा एक उत्तम कॅच घेतला. मात्र, असं असतानाही अंपायरने त्याला नाबाद दिले. यानंतर वॉर्नरने तुफान फलंदाजी करत शतकचं ठोकलं. मात्र त्यामुळे आता डेर मर्वेचा हा झेल वादात सापडला असून अनेक लोकं याविषयी विविध दावे करतायत. अशा परिस्थितीत आयसीसीचे नियम काय म्हणतात हे जाणून घेऊया.
David Warner चा कॅच ठरला विवादाचं कारण
ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत असताना 23 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. बास डी लीडे नेदरलँड्सकडून २३ वी ओव्हर टाकत होता. यावेळी 5व्या बॉलवर फलंदाजी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने एक शॉट मारला. हा शॉट थेट डर मर्वेच्या हातात गेला आणि मर्वेनेही सहजतेने झेल घेतला. मात्र त्यानंतर अंपायरने हा कॅच नॉट आऊट दिला. त्यानंतर सोशल मीडियावर वॉर्नरच्या झेलची चर्चा सुरू झाली.
अनेकांनी यावेळी वॉर्नर आऊट असल्याचं म्हटलंय. तर काहींना अंपायरने दिलेला हा निर्णय योग्य असल्याचं म्हणत वॉर्नर नॉट आऊट दिल्याचं समर्थन केलंय. दरम्यान यावेळी आयीसीसीचा नियम काय सांगतो, हे लक्षात घेऊया.
काय सांगतो क्रिकेटचा नियम
फिल्डींग करताना कॅच घेताना डेर मर्वेने एक चूक केली. कॅच घेतल्यानंतर, त्याच्या हातात असलेला बॉल जमिनीला स्पर्श करत होता. या कारणाने अंपायरने वॉर्नरला नॉट आऊट दिलं. आयसीसीच्या नियमांनुसार फिल्डरने कॅच घेताना जर जमिनीला बॉल लागला तर तो नाबाद मानला जाईल. याशिवाय बॉलऐवजी हाताने जमिनीला स्पर्श केल्यास तो अचूक कॅच मानला जातो.
एक कॅच नेदरलँड्सला पडला महागात
डेव्हिड वॉर्नरचा हा झेल नेदरलँडला चांगलाच महागात पडलेला दिसला. पहिली विकेट गमावल्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथने दुसऱ्या विकेटसाठी 132 रन्सची पार्टनरशिप केली. स्टीव्ह स्मिथने देखील या सामन्यात 71 रन्सची खेळी केली. यावेळी त्याने 1 सिक्स आणि 9 फोर लगावलेत. तर दुसरीकडे वॉर्नरने नेदरलँड्सच्या गोलंदाजांचा समाचार घेत शतक लगावलं.