मोहम्मद शमीला घरात घुसून मारण्याचा प्रयत्न
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कोलकातामध्ये 4 लोकंविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
नवी दिल्ली : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कोलकातामध्ये 4 लोकंविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. शमीने या लोकांविरोधात शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे. घरात घुसून त्याला मारण्याचा देखील प्रयत्न केल्याचा आरोप शमीने केला आहे.
शमीने ४ लोकांविरोधात केली तक्रार
शमी याने आपल्या तक्रारीत सांगितले की चारही लोकांनी बिल्डींगच्या गार्डला देखील मारहान केली. पोलिसांनी यानंतर शमीच्या घराच्या आजुबाजुची सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने एका व्यक्तीची ओळख पटली आणि त्यानंतर चार आरोपींना पोलिसांनी अटक केली.
काय होतं प्रकरण ?
मोहम्मद शमी त्याच्या कुटुंबासोबत घरी येत असतांना त्याच्या गाडीच्या ड्राईव्हरची एका मग बाईक चालकाशी वाद झाला. शमीच्या ड्राईव्हरला गाडी पार्क करायची होती. त्यासाठी तो वाट बघत होता. पण त्यादरम्यान बाईकवर असलेला युवक शामीच्या ड्राईव्हरला शिवीगाळ करु लागला. गाडी का थांबवली यावरुन वाद झाला. वाढतं प्रकरण बघत मोहम्मद शमी गाडीतून बाहेर आला आणि प्रकरण मिटवलं. शमीला बघून बाईकचा मालक थोडा शांत झाला. त्यानंतर तो घरी आला. मोहम्मद शमी बुधवारला श्रीलंका दौऱ्यासाठी जाणार आहे. जेथे भारत 3 कसोटी, 5 वनडे आणि एक टी 20 सामना खेळणार आहे.