नवी दिल्ली : मागच्या वर्षीची चॅम्पियन आणि पहिल्या स्थानावर असलेली भारताची बॅटमिंटन खेळाडू पी.व्ही सिंधुने थायलंडच्या खेळाडूचा पराभूत करुन इंडिया ओपन 2018 बॅडमिंटन टूर्नमेंटच्या महिला एकेरीमध्ये फायनलमध्ये धडक दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओलिंपिक सिल्वर पदक विजेता सिंधुने सेमीफायनलमध्ये आक्रमक खेळ दाखवत विश्व चॅम्पियन थायलंच्या वरीय इंतानोनला 48 मिनिटात पराभूत केलं. 21-13, 21-15 ने तिने विजय मिळवला.


रविवारी फायनलमध्ये त्यांचा सामना वर्ल्ड नंबर-11 अमेरिकेच्या बीवेन झांग सोबत होणारे. जिने दूसऱ्या सेमीफायनलमध्ये हाँगकाँगच्या चेयुंग नगान यी हिला 14-21, 21-12, 21-19 ने पराभूत केलं.