नवी दिल्ली : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू रविवारी झालेल्या योनेक्स-सनराईज 'डॉ. अखिलेश दास गुप्ता इंडिया ओपन बॅडमिंटन टूर्नामेंट'च्या महिला एकल फायनलमध्ये पराभूत झालीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंधूनं गेल्या वर्षी हा खिताब आपल्या नावावर नोंदविला होता. सिंधूला सिरी फोर्ट स्पोर्टस कॉम्प्लेक्स स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये अमेरिकेच्या बेईवान झांगनं तीन डावांपर्यंत चाललेल्या सामन्यात मात दिली. 


झांगनं १ तास ९ मिनिटांपर्यंत चाललेल्या सामन्यात सिंधूला २१-१८, ११-२१, २२-२० अशा फरकानं मात देत ट्रॉफीवर कब्जा केला. बेईवाननं आपल्या करिअरमध्ये पहिल्यांदाच हा खिताब आपल्या नावावर केलाय.