मुंबई : टी-20 विश्वचषकात उपांत्य फेरीपूर्वी पाकिस्तानने एकही सामना गमावला नव्हता. पण ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत (PAK vs AUS T20 विश्वचषक) आपल्या विजयी मोहिमेला ब्रेक लावला आणि पाकिस्तानचे T20 विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले. मात्र, त्यानंतरही कॅप्टन बाबर आझमचा आत्मविश्वास कमी झालेला नाही. सामन्यानंतर ड्रेसिंग रुममधील त्याच्या भाषणातूनही हे सिद्ध झाले. पराभवाचे खापर कोणत्याही एका खेळाडूवर न टाकता त्याने सगळ्या खेळाडूंना असे न करण्याच्या सूचना दिल्या. याचा एक व्हिडिओ पीसीबीने ट्विटरवर शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आझम ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरही निराशा होती. मात्र त्याने खेळाडूंना प्रोत्साहन दिले. पाकिस्तानचा कर्णधार म्हणाला- “दु:ख आपल्या सगळ्यांना आहे, आपण काय चूक केली, कुठे चुकलो, कोणीही एकमेकांना सांगणार नाही, कारण सर्वांनाच हे माहित आहे. त्याने खेळाडूंना सांगितले की, कोणीही कोणाला सांगणार नाही की आपण त्याच्या चुकीमुळे किंवा ह्याच्य चुकीमुळे हरलो. एक संघ म्हणून आपली एकता कायम ठेवायची आहे. संपूर्ण संघ खराब खेळला. म्हणूनच कोणीही चिडणार नाही किंवा कोणाकडे बोट दाखवणार नाही."


बाबर इथेच थांबला नाही. तो पुढे म्हणाला, "होय, आपण हरलो आहोत. पण हरकत नाही. या पराभवातून आपण यातून धडा घेऊ आणि आगामी मालिका आणि स्पर्धांमध्ये येथे झालेल्या चुकांची पुनरावृत्ती करणार नाही. प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपण जो संघ तयार केला आहे, ती तुटू नये. एका पराभवाने आपली एकी तुटू नये. आम्ही सर्वांनी आमची भूमिका बजावली आहे, एक कुटुंबासारखे वातावरण तयार केले आहे. एका पराभवामुळे याकडे दुर्लक्ष करू नका. पणण सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागते. त्यानंतर आपोआप निकाल येऊ लागतील.



आझमने 'या' खेळाडूला दिली चेतावनी 


आझम येथे हसन अलीचा बचाव करत होता. ज्याने सामन्याच्या 19व्या षटकात मॅथ्यू वेडचा झेल सोडला होता आणि त्यानंतर वेडने सलग 3 षटकार मारत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता. तेव्हापासून चाहते हसन अलीला पराभवाचे खापर फोडत आहेत. ट्विटरवर त्याला खलनायक ठरवले जात आहे.