PAK vs BAN : बांगलादेशने पाकड्यांना चारली धूळ, इतिहास रचताच WTC Points Table मध्ये मोठा उलटफेर
WTC Points Table, PAK vs BAN : बांगलादेशने पाकिस्तानचा 10 विकेट्सने पराभव केल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर झाल्याचं चित्र दिसतंय.
World Test Championship Points Table : बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्या संघाने यजमान संघाचा 10 विकेट्सने पराभव केला आहे. सामना ड्रॉ होईल, अशी परिस्थिती दिसत असताना बांगलादेशच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला गुडघ्यावर टेकवलं अन् पहिला सामना खिशात घातला. बांगलादेशने कसोटी इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानचा पराभव केल्याने रेकॉर्ड देखील रचला गेलाय. त्याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर झाल्याचं चित्र देखील पहायला मिळतंय.
बांगलादेशची भरारी
पाकिस्तानला घरच्या मैदानावर कसोटी सामन्यात 10 गडी राखून पराभूत करणारा बांगलादेश हा पहिला संघ ठरला आहे. एकीकडे इतिहास रचल्यानंतर बांगलादेशला र्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाईंट्स टेबलमध्ये मोठी आघाडी देखील घेता आली आहे. या विजयासह बांगलादेश संघ सहाव्या स्थानावर पोहोचला. त्याच्या गुणांची टक्केवारी 40 वर पोहोचली आहे. याआधी बांगलादेशचा संघ 8 व्या स्थानी होता. आता बांगलादेशला दोन स्थानी आघाडी मिळाली आहे. तर पाकिस्तानला मोठा धक्का बसलाय.
पाकिस्तानला धक्का
पाकिस्तानचा संघ या सामन्याआधी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाईंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानी होता. आता सामना गमावताच पाकिस्तानची आठव्या स्थानी घसरगुंडी झाली आहे. पाकिस्तानच्या खात्यात 22 गुण आहेत आणि गुणांची टक्केवारी 30.56 आहे. त्यामुळे आता पाकिस्तानच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
टीम इंडिया कोणत्या स्थानावर?
टीम इंडिया आणि गतविजेता ऑस्ट्रेलिया अनुक्रमे ६८.५ आणि ६२.५ गुणांसह अव्वल दोनमध्ये कायम आहे. बांगलादेशचा संघ पाकिस्तानच दौरा झाल्यानंतर भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे भारतासमोर मोठं आव्हान असणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. त्यासाठी आता टीम इंडिया कसून तयारी करताना दिसतीये.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद आणि नाहिद राणा.
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, सॅम अयुब, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, खुर्रम शहजाद आणि मोहम्मद अली.