PAK vs BAN 1st Test : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात खेळत असताना गुड न्यूज मिळाली. शाहीनची पत्नी अंशा आफ्रिदी हिने मुलाला जन्म दिला. अली यार असं या मुलाचं नाव ठेवण्यात आलंय, अशी माहिती कुटूंबियांकडून देण्यात आली आहे. बांगलादेशविरुद्धचा पहिला कसोटी सामना संपल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदी उद्या रात्री कराचीला रवाना होणार आहे. मात्र, शाहीनला गुड न्यूज मिळाल्यानंतर त्याने खास अंदाजाच मुलाचं स्वागत केलं. त्याचा व्हिडीओ सध्या क्रिडाविश्वात तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना ड्रॉ होण्याच्या मार्गावर आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी पाकिस्तान दुसऱ्या इनिंगवेळी 10 धावांवर आहे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 448 धावा उभ्या केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना बांगलादेशने 565 स्कोर बोर्डवर लावून पाकिस्तानच्या पुंग्या टाईट केल्या. पाकिस्तानच्या गोलंदाजीवेळी खास क्षण राहिला तो शाहीन शाहने घेतलेली विकेट... बांगलादेशचा खेळाडू हसन महमूदची विकेट काढल्यावर शाहीन खास सेलिब्रेशन केलं.


शाहीने हसन महमूदला शुन्यावर बाद केल्यानंतर शाहीनने आपले दोन हात वर केले अन् नंतर मुलगा झाल्याची गुड न्यूज सर्वांना दिली हाताशारे करून दिली. शाहीने हसन महमूदची विकेट आपल्या लेकाला समर्पित केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.



पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, सॅम अयुब, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, खुर्रम शहजाद आणि मोहम्मद अली.


बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद आणि नाहिद राणा.