India vs Pakistan Fakhar Zaman : कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान (PAK vs IND) यांच्यात सुपर- 4 चा सामना सुरु आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पाकिस्तानचा निर्णय चुकला अन्  भारताच्या सलामीवीरांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांना फोडून काढलं. शुभमन आणि रोहितने (Rohit Sharma) अर्धशतक ठोकत चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर आता विराट कोहली अन् केएल राहुल मैदानात खेळत आहेत. अशातच आता पावसाने खेळ मांडल्याने अनेकांचा हिरमोड झालाय. मात्र, पाऊस आला अन् पाकिस्तानच्या एका खेळाडूने ( Fakhar Zaman) मन जिंकलंय. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानचा स्टार खेळाडू फकर झमान (Fakhar Zaman) याने कर्मचाऱ्यांना मदतीचा हात दिला.  कव्हर्स वजनाने जड असतात त्यामुळे ओढताना कर्मचाऱ्यांची कसर लागले. अशातच फखर जमान त्या कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावल्याने त्याचं सध्या कौतुक होताना दिसत आहे. पावसामुळे खेळ थांबला त्यावेळी टीम इंडियाच्या 24.1 ओव्हरमध्ये 147 धावा झाल्या होत्या. 


पाहा Video




भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (W), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.


पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (C), मोहम्मद रिझवान (W), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस रॉफ.