PAK vs IND, Hardik Pandya : गल्ली क्रिकेटमधल्या पोरांना धुवावं अशी फलंदाजी विराट कोहली (Virat Kohli) अन् केएल राहुल (KL Rahul) यांनी केलीये. श्रीलंकेच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर दोन्ही स्टार प्लेयर्सने पाकिस्तानच्या गोलंदाजांना धुवून काढलं. स्पिनर असो वा फास्टर... मैदानाच्या चारही बाजूला धुतला.  दोघांनी आपलं शतक पूर्ण केलं अन् टीम इंडियाचा ऐतिहासिक स्कोरवर पोहोचवलं. 356 धावा करत भारताने पाकिस्तानविरुद्धच्या सर्वोच्च धावसंख्येचा रिकॉर्ड कायम ठेवला आहे. भारताने दिलेल्या टार्गेटसमोर पाकिस्तानच्या दैना उडाल्याचं पहायला मिळतंय. 357 धावांचं आव्हान पार करताना भंबेरी उडली. सुरूवातीच पाकिस्तानला दोन धक्के बसले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचं आव्हान पार करताना पाकिस्तानला (India Vs Pakistan) घाम फुटला आहे. पाकिस्तानने सावध सुरूवात केली. मात्र, बुमराहने सलामीजोडी फोडली. इमाम-उल-हक फक्त 9 धावा करत बाद झालाय. त्यानंतर मैदानात आला बाबर आझम (Babar Azam). बाबरने बुमराहला खेळून काढलं. मात्र, कॅप्टन रोहितने आपला दुसरा हुकमी एक्का मैदानात उतरवला. उपकर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) पहिल्याच ओव्हरमध्ये बाबरला जाळ्यात अडकवला आणि सामन्याच्या चौथ्या बॉलवर बाबरला इनस्विंग टाकला. बाबरला बॉल समजण्याच्या आत बाबरच्या दांड्या उडाल्या होत्या. अनपेक्षितरित्या बॉल आत वळाल्याने बाबरला काहीही समजलं नाही.


पाहा Video



दरम्यान, बाबर आझम हा आयसीसी रँकिंगनुसार जगातील सर्वोत्तम वनडे फलंदाज आहे. मात्र, भारताविरुद्ध काय नंबर एक अन् नंबर दोन... ज्याचा काटा काढायचा तो काढणारच. हार्दिक पांड्याने आपली भूमिका चोखपणे निभावली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.


आणखी वाचा- KL Rahul ने शादाबला मारला सर्वात कडक शॉट; विराटही बसला धक्का... पाहा Video


भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (W), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.


पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (C), मोहम्मद रिझवान (W), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस रॉफ.