Usman Khan and Shaheen Shah Afridi : टी-ट्वेंटी विश्वचषक 2024 चा 36 वा सामना पाकिस्तान आणि आयर्लंड (PAK vs IRE) यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघ वर्ल्ड कपमधून (T20 World Cup 2024) बाहेर पडले आहेत. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी फक्त औपचारिक होता, ज्यामध्ये दोन्ही संघ सन्मान वाचवण्यासाठी खेळत आहेत. अशातच या सामन्यात धक्कादायक घटना पहायला मिळाली. पाकिस्तानच्या फिल्डिंगची (Pakistan fielding Video) अनेकदा खिल्ली उडवली जाते. अशातच आता उस्मान खान (Usman Khan) आणि शाहिन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) यांच्यात जोरदार धडक झाल्याची घटना समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, आयर्लंडची बॅटिंग चालू होती. 14 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर आयरिश फलंदाज मार्क अदीर स्ट्राईकवर होता. त्यावेळी त्याने इमाद वसीमविरुद्ध हवेत शॉट खेळला. बॉल उंच उडाला अन् पाकिस्तानच्या प्लेयरची कॅचसाठी धडपड सुरू झाली. शाहीन आफ्रिदी आणि उस्मान खान कॅच घेण्यासाठी धावले. दोघांनीही एकमेकांना कॉल दिला नाही आणि धावत सुटले. दोघंही फिल्डर बॉल घेण्यासाठी आले अन् धडकले.


शाहिनची उंची जास्त असल्याने त्याने बॉल पकडला पण त्याचवेळी उस्मानची त्याला धडक बसली. दोघंही आपटले पण शाहिनचा हात उस्मानला लागला अन् उस्मान जमिनीवर कोसळला. त्यानंतर शाहिनने उस्मानला मदत केली. त्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.


पाहा VIDEO


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ICC (@icc)


आयर्लंड प्लेइंग ईलेव्हन: पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल आणि बेंजामिन व्हाइट.


पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन: बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सॅम अयुब, फखर जमान, उस्मान खान, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, अब्बास आफ्रिदी, हरिस रौफ आणि मोहम्मद अमीर.