दुष्काळात तेरावा महिना! एका संघाचा विजय पक्का असताना पचांनी `त्या` निर्णयाने मॅच झाली ड्रॉ
दोन्ही संघांना विजय मिळवण्यासाठी समान संधी होती. मात्र दोघांचा संघर्ष चालू होण्याआधीच पंचांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे सगळी गणित बिघडलीत.
Pakistan vs New Zealand Test Series : पाकिस्तान आणि न्यूझीलंडमधील दुसरा कसोटी सामना शेवटला एखाद्या टी-20 सामन्यासारखा होणार होता. कारण दोन्ही संघांना विजय मिळवण्यासाठी समान संधी होती. मात्र दोघांचा संघर्ष चालू होण्याआधीच पंचांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे सगळी गणित बिघडलीत. सामना कोणाच्याच पारड्यात न जात ड्रॉ झाला. पंचांच्या या निर्णयामुळे क्रीडा विश्वातून नाराजी व्यक्त केली जात आहे. (Pak vs NZ Test draw karachi aleem dar dra match decesion latest marathi sports news)
नेमकं काय झालं?
पाकिस्तान आणि न्यूझीलंडमधील सामन्यात शेवटच्या दिवशी न्यूझीलंडने पाकिस्तानला विजयासाठी 319 धावांचे लक्ष्य दिले होते. न्यूझीलंडला 1 विकेटची तर पाकिस्तानला अवघ्या 15 धावांची गजर होती. दोघांपैकी एका संघाने सरशी साधली असती तर संपूर्ण सामना त्यांच्या नावावर होता. मात्र पंचांनी खराब प्रकाशामुळे पाकिस्तानी पंच अलीम दार यांनी सामना अनिर्णित घोषित केला. त्यामुळे दोन्ही संघाचे चाहते नाराज झाले.
चाहत्यांनी पंच अलीम दार यांनी सामना ड्रॉ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. पंचांनी आता निवृत्ती घ्यावी, अलीम दार यांना 'मॅन ऑफ द सीरीज', अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळालेल्या. सरफराज अहमदने अर्धशतक करत दमदार शतक झळकवलं. 'मॅन ऑफ द सीरीज' या किताबाने त्याला गौरवण्यात आलं.