SA vs PAK : रिझवानने शिवीगाळ करत जान्सनविरुद्ध खेळला रडीचा डाव? पाहा LIVE सामन्यात नेमकं काय झालं?
PAK Vs SA World Cup 2023 : मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याने सामना जिंकण्यासाठी थेट मार्को जॅन्सन (Marco Jansen) याच्याशी पंगा घेतल्याचं दिसून आलंय. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Pakistan vs South Africa : पाकिस्तान आणि साऊथ अफ्रिका (PAK Vs SA) यांच्यात चेन्नईच्या चिंदबरम स्टेडियमवर सामना खेळवला जात आहे. पाकिस्तानने निर्णायक अशा सामन्यात टॉस जिंकला आणि बाबर आझमने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचा आजचा पराभव त्यांना थेट वर्ल्ड कपमधून (World Cup 2023) बाहेर करू शकतो. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंसाठी आज करो या मरो अशी परिस्थिती असेल. अशातच आता जिंकण्यासाठी पाकिस्तानने रडीचा डाव खेळल्याचं समोर आलं आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानची फजिती झाल्याचं दिसून आलं. अशातच मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याने सामना जिंकण्यासाठी थेट मार्को जॅन्सन (Marco Jansen) याच्याशी पंगा घेतल्याचं दिसून आलंय.
नेमकं काय झालं?
झालं असं की... पाकिस्तानने आजच्या सामन्यात कमीत कमी 300 धावा करण्याचं लक्ष ठेवलं होतं. मात्र, सुरूवात खराब झाली. दोन्ही सलामीवीर झटपट तंबूत परतले. अब्दुल्ला शफीक याने 9 धावा केल्या तर इमाम-उल-हक याने फक्त 12 धावा केल्या. त्यामुळे 38 वर 2 विकेट परिस्थिती पाकिस्तानची होती. त्याचवेळी मैदानात मोहम्मद रिझवान याने एन्ट्री केली. रिझावनने सुरूवातीपासून आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला साऊथ अफ्रिकेच्या गोलंदाजांनी आवर घातला. त्यामुळे रिझवान चांगलाच पेटला होता.
रिझवान मैदानात आल्यावर 7 व्या ओव्हरमध्ये जान्सन गोलंदाजी असताना रिझवानने एक फोर मारला. त्यावेळी रिझवान जान्सनला काहीतरी बोलला. त्यावरून चांगलाच वाद पेटला होता. त्यामुळे जान्सन आणि रिझवान यांची बाचाबाची झाली. मात्र, जेराल्ड कोएत्झी आणि बाबर आझम यांनी मध्यस्ती केली अन् वाद शमवला.
पाहा Video
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जान्सन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, तबरेझ शम्सी, लुंगी एनगिडी
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, शादाब खान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर, हरिस रौफ.