लाहोर : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचे जगभरात फॅन्स आहेत. आपल्या आक्रमक खेळी आणि हटके स्टाईलनं विराटनं अगदी कमी वेळातच क्रिकेटप्रेमींच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आणि अनेक मुलींची मने जिंकली. त्याच्या फॅन्समध्ये मुलींची संख्या तर थोडी अधिकच आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता यातल्या अनेक मुलींना त्याला एकदा जवळून पाहण्याची, त्याच्यासोबत डेटला जाण्याची किंवा लग्न करण्याची इच्छा असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच मैदानात एखादी मुलगी ‘मॅरी मी’चं पोस्टर हातात घेऊन उभी राहिली तर त्यात फार काही नवल वाटणार नाही. पण हेच ‘मॅरी मी’ पोस्टर एखाद्या पुरुषाच्या हाती असेल तर ?


सध्या लाहोरमधील एका सुरक्षारक्षकाचा फोटो चांगलाच चर्चेत आहे. ‘कोहली माझ्याशी लग्न कर’, अशी लग्नाची मागणी घालणारं पोस्टर घेऊन तो स्टेडियममध्ये उभा होता. आतापर्यंत विराटला अनेक चाहत्यांनी लग्नासाठी विचारलं असेल पण कोहलीसाठी आलेलं हे लग्नाचं प्रपोजल मात्र सगळ्यात हटके होतं. या सुरक्षारक्षाकाचं नाव काय आहे ते समजलं नाही. 


आता त्याने स्वत:हून हे पोस्टर हातात घेतले की कोणतरी त्याला मुद्दामहून हे पोस्टर पकडायला सांगितले हे देखील स्पष्ट झालेलं नाही. पण कोहलीसाठी आलेलं हे पाकिस्तानी प्रपोजल मात्र सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.