T20 World Cup : Ind vs Pak सामन्यानंतर बाबर आझमच्या ‘त्या’ कृतीने सर्वांना आठवला धोनी, नक्की काय झालं?
काही अंदाज लावता येतोय का? म्हणजे सामना जिंकावा भारतीय संघाने, पराभव व्हावा पाकिस्तानचा तरीही चर्चेत यावं धोनीने? अजबच ना… बरं, धोनी चर्चेत आलाय तोसुद्धा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (babar azam) याच्यामुळे. नेमकं झालंय तरी काय?
T20 World Cup : टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघानं दणक्यात सुरुवात करत पाकिस्तानवर मात केली (ind vs pak). शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या अटीतटीच्या सामन्यामध्ये विराट कोहलीच्या (Virat kohli) संयमी खेळीनं क्रिकेटप्रेमींची दाद मिळवली. तर, नाही म्हणता पाकिस्तानच्या गोलंदाजीचीही प्रशंसा झाली. पण, या साऱ्यामध्ये एकाएकी महेंद्र सिंह धोनी, अर्थात Team India चा माजी कर्णधार का बरं आठवू लागलाय?
काही अंदाज लावता येतोय का? म्हणजे सामना जिंकावा भारतीय संघाने, पराभव व्हावा पाकिस्तानचा तरीही चर्चेत यावं धोनीने? अजबच ना… बरं, धोनी चर्चेत आलाय तोसुद्धा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (babar azam) याच्यामुळे. नेमकं झालंय तरी काय?
महेंद्र सिंह धोनी (Mahendra singh dhoni ) हा त्याच्या ऑनफिल्ड Performance सोबतच त्याच्या ऑफफिल्ड अर्थात मैदानाबाहेरील वर्तणुकीसाठीही कायमच प्रसिद्ध होता आणि आताही आहे. आतापर्यंत आपण पाहिलं असेल, की कोणताही सामना असो जेतेपद मिळाल्यानंतर हातात आलेली ट्रॉफी धोनी क्षणाचाही विलंब न लावता त्याच्या संघातील खेळाडूंच्या हाती सोपवतो. युवा खेळाडूंना प्रेरणा देण्यापासून तो कधीच मागे हटत नाही. इतकंच काय, तर विमान प्रवासादरम्यान त्याने कितीदारी सोबतच्या खेळाडूंना किंवा विमानातील काही व्यक्तींना आपली Business Class ची जागा दिली आहे. हा मनाचा मोठेपणा नाही, तर आणखी काय?
अधिक वाचा : Virat Kohli : विराटच्या वादळी खेळीने कुणाचा बाजार उठवला?
माहीच्या याच कृतीची पुनरावृत्ती बाबर आझमनं केली आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानचा संघ मेलबर्नहून पर्थच्या दिशेनं रवाना झाला. त्याचवेळी बाबरनंही आपली बिझनेस क्लासची सीट संघातील गोलंदाजाला दिली.
एका पत्रकारानं ट्विट करत यासंबंधीची माहिती देत लिहिलं, ‘ऑस्ट्रेलियामध्ये बरेचजण असं म्हणत आहेत की बाबर आझमनं आपली बिझनेस क्लास सीट संघातील Fast Bowler ला दिली. जेणेकरून त्याला (खेळाडूची उंची जास्त असल्यामुळे) व्यवस्थित जागा मिळू शकेल. मेलबर्न ते पर्थदरम्यान 4 तासांचा विमान प्रवास आहे, फ्लाईटमध्ये जागा कमी आहे परिणामी संपूर्ण संघासाठी business class मध्ये जागा कमी आहे.’
बाबरची ही कृती काहीशी धोनीप्रमाणेच असल्यामुळे या बाबतीत तो धोनीच्या पावलावर पाऊल टाकत असल्याची प्रतिक्रिया क्रिकेटप्रेमींनी दिली आहे. थोडक्यात यावेळच्या वर्ल्डकपमध्ये धोनीनं अप्रत्यक्ष हजेरी लावलीच.