World Cup 2023 : भारत पाकिस्तान सीमेवर पाकिस्तान सैनिकाकडून अनेक वेळा कुरापती करण्यात आल्या आहेत. पण बॉर्डरवरील ही कुरापती वर्ल्ड कप मॅच दरम्यानही दिसली अशी चर्चा रंगली आहे. हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर श्रीलंका आणि पाकिस्तान मॅच दरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये बाऊंड्रीवर पाकिस्तान संघाकडून फसवणूक केल्याचा आरोप होतो आहे. (Pakistan Caught Cheating Again Boundary Rope Controversy Rocks Cricket World Cup 2023 Video Goes Viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅच दरम्यान श्रीलंकेचा फलंदाज कुसल मेंडिसला आऊट करण्यासाठी पाकिस्तानच्या खेळाडूने फसवणूक केल्याचा आरोप होतो आहे. श्रीलंका फलंदाजी करत असताना 29 व्या ओवरमध्ये हसन अलीच्या बॉलिंगवर 122 रनवर आऊट केलं. कुसलने बल्ला फिरवला आणि चेंडू बाऊंड्री असलेल्या पाकिस्तान खेळाडू इमाम उल हकने कॅच घेतला. 





कुसल मेंडिस खरंच आऊट नाही?


सोशल मीडियावर चाहत्यांनी उपस्थित केलेले प्रश्न पाहता बाऊंड्री रोप मागे सरकली गेली होती, त्यामुळे कुसल आऊट नाही. पण आम्ही तुम्हाला सांगतो की, इमाम उल हक बाऊंड्री रोपवर असतानाच त्याने तो बॉल झेलला या सगळ्यात तो रोप मागे ढकलल्या गेला. त्यामुले कुसम कायदेशीर आऊट झाला आहे. तर इमामने कॅच पकडल्यामुळे कुसल मेंडिसला 77 चेंडूत 14 चौकार आणि सहा षटकारांसह 122 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले आहे.