Pakistan Cricket Team : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेतील खराब कामगिरी नंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये (Pakistan Cricket) जोरदार वाद सुरु आहेत. पाकिस्तानी खेळाडू आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्यात कोणताच ताळमेळ नसल्याचंही समोर आलं आहे. एकदिवसीय विश्वचषकातील पराभवानंतर बाबर आझमला (Babar Azam) तात्काळ पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधारपदापासून दूर व्हावं लागलं. तर संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांनाही पदावरुन काढून टाकण्यात आलं. हा वाद क्षमतो न क्षमतो तोच आता आणखी एका कारणामुळे पाकिस्तान क्रिकेटमधलं वातावरण गरम झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक दिग्गज खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्याच्या तयारीत आहेत. काही टॉपचे खेळाडू पीसीबीबरोबरचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट रद्द करु शकतात. याचं महत्त्वांच कारणाचं आहे खेळा़डूंना परदेशी प्रीमिअर लीगमध्ये खेळण्यापासून रोखलं जातंय. पाकिस्तान क्रिकेट संघाचे सामने नसाताना किंवा राष्ट्रीय संघात नसतानाही खेळाडूंना परदेशी प्रीमिअर लीगमध्ये खेळण्यास परवानगी दिली जात नाहीए. पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू जमान खान, फखर जमान आणि मोहम्मद हारिस यांना बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये खेळण्यास पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलं नाही. पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळले असल्याने त्यांना एनओसी देण्यास पीसीबीने नकार दिलाय. 


पीसीबीच्या नियमानुसार बोर्डाशी करार केलेले खेळाडू आंतरराष्ट्रीय सामन्यांशिवाय दोन परदेशी टी20 लीगमध्ये खेळू शकतात. पण बोर्डाशी करार नसलेल्या खेळाडूंना असं कोणतंही बंधन नाही. 


पाकिस्तान क्रिकेटमध्ये उलथापालथ
2023 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ झाली. बाबर आझमने कर्णधारपदाला सोडचिठ्ठी दिली. तर हेड कोच, बॅटिंग कोच, बॉलिंग कोच आणि टीमच्या डायरेक्टरला आपलं पद गमवावं लागलं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या मोहम्मद हाफीजला डायरेक्टर आणि कोच तर वहाब रियाजला (Wahab Riyaz) चीफ सिलेक्टरपदी नियुक्त करण्यात आलं. विश्वचषक स्पर्धा सुरु असतानाच माजी कर्णधार इंजमाम उल हकनेही चीफ सिलेक्टर पदाचा राजीनामा दिला होता. 


त्यानंतरही पराभव पिछा सोडेना
विश्वचषकातील पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठे बदल करण्यात आले. पाकिस्तान कसोटी संघाच्या कर्णधारपदी शान मसूद (Shan Masood) तर टी20 संघाच्या कर्णधारपदी शाहीन आफ्रीदीची  (Shaheen Afridi) नियुक्ती करण्यात आली. पण बदलानंतरही पराभवाने पाकिस्तान क्रिकेटचा पिछा सोडलेला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला 3-0 तर टी20 मालिकेत 4-1 असा पराभव पत्करावा लागला होता.