मुंबई : आक्रमक बॅटसमन आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेला पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रीदीने, काश्मीरवर असं वक्तव्य केलं आहे की, सर्व पाकिस्तानींचा तिळपापड होईल. आफ्रिदी म्हणतोय की, पाकिस्तानने काश्मीरवर दावा करणं बंद केलं पाहिजे. त्यापेक्षा पाकिस्तानने आपल्या ४ राज्यांवर लक्ष दिलं पाहिजे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानात क्रिकेटर नेहमीच स्टार मानले जातात. सध्याचे पंतप्रधान इम्रान खान देखील माजी क्रिकेटर आहेत. अशावेळी आफ्रिदीने माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान टीमच्या माजी कॅप्टनला आणि सध्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना हा सडेतोड सल्ला दिला आहे.


ऑफ्रिदीने लंडनमध्ये एक प्रेसमीट केली, यात आफ्रिदी म्हणाला, 'पाकिस्तानला काश्मीरची काही गरज नाही. पाकिस्तानला तर आपली ४ राज्य सांभाळणे कठीण होत आहे, यासाठी काश्मीरला एक स्वतंत्र देश बनवून टाका'.


या आधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यावर भारतातून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.


भारत आणि काश्मीरवर विरोधात ट्वीट केल्यानंतर शाहिद आफ्रिदीला ट्वीटरवर जोरदार ट्रोल करण्यात आलं, यानंतर शाहिद आफ्रिदीने हे वक्तव्य केलं आहे.