नवी दिल्ली : टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन शिखर धवन हा आपल्या कुटुंबियांसोबत दक्षिण आफ्रिकेला जात होता. मात्र, त्या दरम्यान दुबई विमानतळावर काही कागदपत्र नसल्याने एअरलाईन्सने धवनच्या परिवाराला सोबत जाण्यास मज्जाव केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एअरलाईन्सने केलेल्या या कृत्यामुळे शिखर धवनने आपली नाराजी व्यक्त केली. तर, पाकिस्तानी पत्रकारानेही यावर भाष्य केलं. यानंतर शिखर धवननेही या अँकरला उत्तर दिलं आहे.


पाकिस्तानमधील स्पोर्ट्स अँकर जैनब अब्बासने ट्विट करत म्हटलं की, चाईल्ड ट्रॅफीकिंगची समस्येमुळे असं केलं. दक्षिण आफ्रिकेत होत असलेल्या चाईल्ड ट्रॅफीकिंगमुळे जन्माचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. तुम्ही त्या मुलांचे आई-वडील आहात की नाही हे त्यांना तपासायचं असतं. केवळ पासपोर्टवरुन हे स्पष्ट होत नाही. विचित्र नियम आहे मात्र, हेच खरं आहे.



पत्रकार जैनब यांनी केलेल्या या ट्विटनंतर शिखर धवननेही उत्तर दिलं आहे. शिखर धवनने म्हटलं की, मी याच्याशी सहमत आहे मात्र, एअरलाईन्स कंपनीने जन्म प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याचं विमानात बसण्यापूर्वी का सांगितलं नाही. त्यांनी त्यावेळीच सांगायला हवं होतं.


शिखरने म्हटलं, "मी या गोष्टीशी अगदी सहमत आहे. पण, एअरलाईन्स कंपनीची जबाबदारी आहे की आपले नियम प्रवाशांना आधीच सांगावे. आम्ही मुंबईत असातानाच याची कल्पना द्यायला हवी होती. तसं केलं असतं तर आम्ही घरी असतानाच कागदपत्र सोबत घेतले असते.



टीम इंडियासोबत शिखर धवन सध्या दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये दाखल झाले आहेत. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टेस्ट सीरिज सुरु होणार आहे.