डर्बी : महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा डाव  १६९ धावांवर आटोपलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानी स्पिनर्सच्या भेदक माऱ्यासमोर भारताला ९ गड्यांच्या मोबदल्यात ५० षटकांत १६९ धावा करता आल्या. पाकिस्तानसमोर विजयासाठी १७० धावांचे आव्हान आहे. 


भारताकडून सलामीवीर पूनम राऊतने सर्वाधिक ४७ धावा केल्या. तर सुषमा वर्माने ३३ धावांची खेळी केली. दीप्ती शर्माने २८ धावा केल्या. भारताचे बाकी इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. 


पाकिस्तानच्या नाशरा संधूने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर सादिया युसुफने २ विकेट घेतल्या.