मुंबई: बॉलिवूड आणि क्रिकेटचं नातं खूप जुनं आहे. विराट अनुष्का असो किंवा युवराज सिंह हेजल असो किंवा अशी अनेक नाव घेता येतील. पाकिस्तानचा माजी कर्णधार देखील बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात होता अशी एकेकाळी चर्चा होती. हे दोघंही डेट करत असल्याचं त्यावेळी चर्चा होती मात्र ही प्रेमकहाणी अधुरीच राहिली. याच त्याच्याबद्दल जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अकरमचं बॉलिवूडसोबत खास नातं आहे. याचं कारण माजी वेगवान गोलंदाजाचा स्टार अभिनेत्रीवर जीव जडला होता. क्रिकेटच्या मैदानात यशस्वी होणाऱ्या या गोलंदाजाला मात्र प्रेमाच्या पिचवर यश मिळवता आलं नाही. वसीम अकरमचं नाव मिस यूनिवर्स सुष्मिता सेनसोबत जोडलं जात होतं.


वसीम अकरम आणि सुष्मिता सेनची पहिली भेट 2008 मध्ये एक खिलाडी एक हसीना या शो दरम्यान झाली होती. या शोमध्ये अकरम आणि सुष्मिता सेन दोघंही सेलिब्रिटी जज होते. त्यावेळी वसीमचं लग्न झालं होतं. 2009मध्ये बायको हुमासोबत त्यांनी तलाक घेतला. त्यानंतर वसीमसोबत सुष्मिताच्या नावाची चर्चा होऊ लागली.


अकरम आणि सुष्मिता सेननं उघडपणे कधीच या रिलेशनवर बोलणं पसंत केलं नाही. मात्र हे दोन्ही सेलिब्रिटी बऱ्याचवेळा एकत्र दिसले होते. त्यावेळी सुष्मिता आणि अकरम डेट करत असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र सुष्मिताने याबाबत येणाऱ्या बातम्या, चर्चा सर्व फेटाळून लावल्या होत्या. 


2013मध्ये सुष्मिताने ट्वीट करत म्हटलं होतं की, 'मी माझ्या आणि वसीमच्या लग्नाबाबत वाचत होते. हा सर्व भंपकपणा आहे.' तर दुसरीकडे अकरमने देखील अफवा असल्याचं म्हणत रिलेशनशिपच्या वृत्तांना फेटाळून लावलं होतं. वसीम अकरमने 2013मध्ये ऑस्ट्रेलियाच्या  शनायरा थॉमसनसोबत लग्न केलं आणि अखेर चर्चांना पूर्णविराम मिळाला.