IND vs PAK : पावसाने सामना धुतला अन् पाकिस्तानला मिळाली गुड न्यूज; रोहित शर्माचं टेंशन वाढलं
Asia Cup 2023, Super 4 : पाकिस्तानने (Pakistan Cricket Team) पहिल्या सामन्यात दुबळ्या नेपाळचा पराभव केला होता. त्यानंतर आता पाकिस्तानचा संघ सुपर फोरसाठी क्वालिफाय झाला आहे. त्यानंतर आता टीम इंडियाचं टेन्शन वाढल्याचं पहायला मिळतंय.
Pakistan qualified for Super 4 : श्रीलंकेत झालेला भारत आणि पाकिस्तान खेळवला गेलेला आशिया कपमधील (Asia Cup 2023) तिसरा सामना पावसामुळे रद्द करावा लागला आहे. पावसाने धुंवाधार बॅटिंग केल्याने सामन्यावर पाणी फेरलं गेलं. भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. भारताने पाकिस्तानसमोर 267 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर पाकिस्तानची फलंदाजी सुरू होण्याआधी पावसाने एन्ट्री केली अन् सामना रद्द ( IND vs PAK Match canceled) करण्याची वेळ आली. सामना रद्द केल्यानंतर दोन्ही संघांना 1-1 अंक देण्यात आला आहे. सामना रद्द झाला अन् पाकिस्तानच्या संघाला गुड न्यूज मिळाली आहे.
कसं आहे पाईंट्स टेबलचं गणित ?
दोन्ही संघांना समान गुण वाटून दिल्यानंतर आता पाकिस्तानने सुपर 4 मध्ये एन्ट्री मारली आहे. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात दुबळ्या नेपाळचा पराभव केला होता. त्यानंतर आता पाकिस्तानचा संघ सुपर फोरसाठी क्वालिफाय झाला आहे. त्यानंतर आता टीम इंडियाचं टेन्शन वाढल्याचं पहायला मिळतंय. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात नेपाळचा तब्बल 238 धावांनी पराभव केला होता. त्यामुळे पाकिस्तानला 4.76 गुण मिळाले असून पाकिस्तानचा संघ पाईंट्स टेबलवर अव्वल स्थानी आहे. त्यामुळे टीम इंडियाला अव्वल स्थान गाठायचं असेल तर नेपाळचा दारूण पराभव करणं गरजेचं आहे. अव्वल स्थान गाठलं तर टीम इंडिया ग्रुप बी मधील क्रमांक दोनच्या संघाशी भिडताना दिसेल. त्यामुळे आशिया कप फायनलचा रस्ता पक्का होईल.
दरम्यान, टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय भारताने पाकिस्तानसमोर 267 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताकडून ईशान किशनने 82 धावांची झुंजार खेळी केली तर टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या 87 धावा करत संकटमोचक ठरला. दुसरीकडे पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने 4 विकेट घेतल्या. तर नसीम शाह आणि हॅरिस रौफने 3-3 विकेट घेतल्या. मात्र, भारताला गोलंदाजीची संधी मिळाली नाही. पाकिस्ताननंतर आता टीम इंडिया आगामी सामना नेपाळसोबत येत्या 4 तारखेला होणार आहे.
पाहा Playing XI
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, इशान किशन (WK), विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (C), मोहम्मद रिझवान (WK), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.