मुंबई: IPL चौदावा हंगाम सुरू होण्यासाठी बोटावर मोजण्याइतकेच तास शिल्लक राहिले आहेत. त्याचवेळी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने वादग्रस्त व्यक्तव्य केलं आहे. 
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. इंडियन प्रीमियर लीगमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर परिणाम होत असल्याचा आरोप शाहिद आफ्रिदीने केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेच्या मध्यभागी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने आपल्या खेळाडूंना भारतात येण्यास कशी परवानगी दिली याबद्दल आफ्रिदीने आश्चर्य व्यक्त केलं आहे. 


पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 3 वन डे मालिकेचा तिसरा सामना खेळला गेला. तिसर्‍या सामन्यात डी कॉक, मिलर, रबाडा या खेळाडूंना सीरिजच्या मधून जाण्याची परवानगी मिळाली. हे तिघांनी संघातून माघार घेतली आणि IPLसाठी भारतात आले.



9 एप्रिलपासून IPL सुरू होत आहे. पाकिस्तान संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सीरिज 2-1ने जिंकला आहे. त्याबद्दल शाहिद अफ्रिदीनं संघाचं अभिनंदन केलं. त्याच सोबत IPLबाबत वादग्रस्त विधानही केलं आहे. 


आफ्रिदीने दुसर्‍या ट्विटद्वारे आयपीएल आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या संघावर निशाणा साधला आहे. "दक्षिण आफ्रिकेने मालिका सुरू असताना खेळाडूंना आयपीएलसाठी जाण्याची परवानगी दिली आहे. हे पाहून आश्चर्य वाटलं. टी -20 लीगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर इतकं वर्चस्व गाजवलं हे पाहून खूपच वाईट वाटतं. याबाबत पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे.''


सर्वांनाच माहीत आहे IPLमध्ये जगभरातील खेळाडू सहभागी होत असतात. सर्वात मोठा खेळ मानला जातो. या खेळासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघातील काही खेळाडू सीरिज अर्धवट सोडून IPLसाठी आल्यामुळे शाहिद आफ्रिदीने निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे भारत पाकिस्तान सुरू असलेल्या वादामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंना IPLमध्ये भाग घेण्यास बंदी घालण्यात आल्यानं संताप व्यक्त केल्याची चर्चा आहे.