AUS vs PAK : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाकिस्तानला मोठा झटका, `या` स्टार खेळाडूला तातडीने रुग्णालयात हलवलं!
Noman Ali Out from Test Series : पाकिस्तानच्या संघाला आणखी एक धक्का बसल्याचं पहायला मिळतंय. पाकिस्तानचा एक स्टार खेळाडू मैदानात न उतरता थेट रुग्णालयात (Noman Ali Hospitalised In Australia) पोहोचला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
Noman Ali Hospitalised In Australia : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (AUS vs PAK) यांच्यात पहिला कसोटी सामना पर्थच्या मैदानावर खेळवण्यात आला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला 360 धावांनी धूळ चारली. त्याचबरोबर मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे. अशातच आता पाकिस्तानच्या संघाला आणखी एक धक्का बसल्याचं पहायला मिळतंय. पाकिस्तानचा एक स्टार खेळाडू मैदानात न उतरता थेट रुग्णालयात पोहोचला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांना (Noman Ali Out from Test Series) मोठा धक्का बसला आहे.
पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज नोमान अलीला (Noman Ali) शनिवारी अपेंडिसिटिसच्या (Appendicitis) तीव्र वेदनामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तो अजूनही तंदुरुस्त असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. पर्थ कसोटीसाठी नोमानचा पाकिस्तानच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश नव्हता. मात्र, त्याला दुसऱ्या कसोटीमध्ये खेळवला जाण्याची शक्यता होती. अशातच आता पाकिस्तानला दुहेरी झटका बसलाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
पीसीबीने सांगितलं कारण!
नोमान अलीने काल अचानक आणि तीव्र ओटीपोटात दुखण्याची तक्रार केली, त्यानंतर आपत्कालीन तपासणी आणि स्कॅन करण्यात आले, ज्यामध्ये अॅपेन्डिसाइटिसची पुष्टी झाली. सर्जनच्या सल्ल्यानुसार, आज त्याची लॅपरोस्कोपिक अॅपेन्डेक्टॉमी करण्यात आली, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) दिली आहे.
दरम्यान, नोमानच्या स्थितीमुळे पाकिस्तानची गोलंदाजी अडचणीत आली आहे. 37 वर्षीय नोमानने 15 कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. सिंधमध्ये जन्मलेल्या या खेळाडूने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 33.53 च्या सरासरीने 47 स्कॅल्प मिळवले आहेत. त्याने एक चार विकेट्स आणि चार पाच विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे आता आगामी सामन्यात नोमानची कमी दिसून येईल, यात काही शंका नाही.