Ugly Fight In Cricket Ground: पाकिस्तान सुपर लिगच्या सामन्यामध्ये इंग्लंडचा फलंदाज जॉसन रॉय आणि पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू इफ्तिकार अहमदमध्ये मैदानात वाद झाला आहे. या स्पर्धेतील क्वोटा ग्लॅडिएटर्स आणि मुल्तान सुलतानच्या संघादरम्यान झालेल्या सामन्यात हा सारा प्रकार घडला. सामन्यात ग्लॅडिएटर्सचा संघ धावांचा पाठलाग करत असताना तिसऱ्या ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर हा प्रकार घडला. या प्रकरणानंतर पंचांना मध्यस्थी करावी लागली.


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की डेव्हीड वॅलीने जॉसन रॉयविरोधात एलबीडब्यूची अपील केली. पंचांनी त्याला बाद घोषित केलं. रॉयने डेव्हीड वॅलीकडे दुर्लक्ष केलं आणि तो नॉन स्ट्राइकर एण्डला असलेल्या सौद शकीलकडे चालत गेला आणि रिव्ह्यू घ्यायचा की नाही याबद्दल चर्चा करु लागला. मात्र रॉय शकीलकडे चालत जात असताना त्याची इफ्तिकार अहमदबरोबर चकमक उडाली. रॉयने चालता चालता इफ्तिकार अहमद समोर आल्यावर पाय वर करुन त्याला डिवचलं. इफ्तिकार अहमद चालत पुढे गेला. मात्र नंतर तो काहीतरी बोलल्याने रॉय पुन्हा त्याच्या दिशेने चालत गेला आणि दोघांमध्ये बाचाबाची झाली.


एकमेकांवर धावून जाणार इतक्यात


हे दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून जाणार असं वाटल्याने सौद शकीलकने आणि इफ्तिकारच्या संघातील सहकाऱ्यांनी मध्यस्थी केली आणि दोघांना एकमेकांपासून दूर केलं. त्यावेळी रॉय दूर झाला. मात्र त्याला बाद होऊन डगआऊटमध्ये परतावं लागल्याने तो फारच संतापला होता. त्याने डगआऊटमध्ये जाऊन बॅट आणि हेल्मेट रागात आपटलं. 



अक्रम संतापला


रॉय आणि इफ्तिकारमध्ये झालेल्या वादासंदर्भात बोलताना पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने इंग्लंडच्या फलंदाजावर टीका केली. रॉयचा हा संताप गरजेचा नव्हता. बिनकामाचा राग दाखवून काय होणार असं अक्रम म्हणाला. रॉयने हे विसरता कामा नये की तो पाकिस्तानात खेळत आहे. रॉयला असे वाद घालण्याची सवयच आहे, असा टोलाही अक्रमने लगावला. "गरज नसताना संताप व्यक्त केला. रॉयला एवढं कळायला हवं की तो पाकिस्तान आहे. त्याने आमच्या खेळाडूचा सन्मान राखला पाहिजे. आमच्या संस्कृतीचा सन्मान राखला पाहिजे. बाद झाल्यानंतर तो ज्या पद्धतीने संतापला ते पाहून त्याचीच चूक असल्याचं दिसत आहे. त्याचा राग बिनकामाचा आहे. तो नेहमीच असं करतो," असं अक्रम म्हणाला.


नक्की वाचा >> 'सर्वात मोठा वाद असा की...'; पंड्या-रोहितचा उल्लेख करत IPL 2024 आधी डिव्हिलियर्सचं वक्तव्य


आयपीएल खेळणार


रॉय आयपीएलमध्ये कोलकाता नाईट राडयर्सकडून खेळणार आहे. बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शकिब अल हसनने माघार घेतल्याने रॉयला संधी देण्यात आली आहे.