कराची : पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये ६ टीम खेळतायत. यातील ५ टीम्सनी एक ना एक मॅच तरी जिंकली आहे. पण एक टीम अशी आहे जी पाचही सामने हरली.


फॅन्स नाराज 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'लाहोर कलंदर' नावाची ती टीम. ब्रॅंडम मॅक्युलम, सुनील नारायण, दिनेश रामदीन, उमर अकमल सारखे दिग्गज यामध्ये आहेत. यांचे फॅन्स टीमचा विजय पाहण्यासाठी आतूर असतात.



पण प्रत्येकवेळी या टीमच्या फॅन्सला नाराजीचा सामना करावा लागतो. यातील एक फॅन जास्तच तापला. त्याने टीम शॉपिंग वेबसाइटवर विकायला काढली. 



ईबेवर विक्रीस 


ईबे शॉपिंग साइटवरील जाहीरातीत सर्वात बेइज्जत करणारी म्हणजे त्याची विक्री किंमत. या टीमची विक्री किंमत १ डॉलर म्हणजे ६५ रुपये इतके मुल्य ठेवण्यात आले.


यावर लिहिलेली एक अट हसण्यासारखी आहे. सर्व पार्ट ठिक आहेत पण एकपण ठिक काम करत नाही. म्हणजेच या टीममध्ये एकापेक्षा एक खेळाडू आहेत पण एकही चालत नाहीए. 


बातमी वाऱ्यासारखी पसरली 


पाकिस्तानपासून भारतापर्यंत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. ईबेकडून हे पेज गायब करण्यात आलय पण सोशल मीडियावरून कोण गायब करणार ? असा प्रश्न विचारला जातोय.