Pak vs Eng Viral Video : पाकिस्तान आणि इंग्लंडमधील (PakvsEng) तिसरा कसोटी सामना कराचीमध्ये सुरू आहे. पहिल्या दिवशी पाकिस्तान संघाचा पहिला डाव 304 धावांवर आटोपला. पाकिस्तानकडून अघा सलमान (Agha Salman) आणि बाबर आझमच्या (Babar Azam) अर्धशतकी खेळीमुळे संघाला सन्माजनक धावसंख्या उभारता आली. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये बाबर आझम रन आऊट झाला आहे. (Pakistan vs England Babar Azam Runout viral video latest sport marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबर आझम शतक करणार असं वाटत होतं. मात्र अघा सलमानच्या चुकीच्या कॉलमुळे बाबरला विकेट गमवावी लागली. 59 व्या ओव्हरवेळी सलमानने मिडवेकेटच्या दिशेने चेंडू मारला. सलमान धाव घेण्यासाठी धावला आणि मध्येच थांबला आणि परत धावू लागला.  त्यामुळे नॉन स्ट्राईकवर असलेला बाबर गोंधळला, तोही थांबला आणि सलमानने धाव घेतल्यामुळे बाबरनेही धाव घेतली. 


इंग्लंडचा फिल्डर हॅरी ब्रूकने बॉल पकडत लगेच फेकला. यष्टिरक्षक बेन फॉक्सने एका हाताने रन आऊट केलं. हा निर्णय घेण्यासाठी लेग अम्पायरने थर्ड अम्पायरची मदत घेतली. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बॅट अगदी क्रीजच्या जवळ होती मात्र मध्ये थांबावं लागल्यामुळे आझमला विकेट गमवावी लागली.  


 



दरम्यान, बाबर आझमचा 100 वा आंतरराष्ट्रीय सामना होता. बाबरने कसोटी कारकिर्दीतील 25 वे अर्धशतक झळकावलं खरं मात्र तो शतकापासून वंचित राहिला. बाबर आझम धावबाद झाल्यामुळे रागाने लालबुंद झालेला दिसला.