लग्नाच्या 4 वर्षानंतर Hasan Ali पहिल्यांदाच सासरवाडीत; लियाकत खान यांनी पहिल्यांदा पाहिलं नातीचं तोंड
Hasan Ali Wife Reached Gurugram : सामिया आरजूचे आई-वडील, भाऊ आणि बहिणीसोबत गुरुग्राममधील (Haryana) फ्लॅटमध्ये राहत आहेत. घरातील सदस्य सामिया आरजूच्या (Samia Arzoo) परतण्याची आतुरतेने वाट पाहत होते.
ICC World Cup 2023 : आयसीसीच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भाग घेण्यासाठी पाकिस्तानचा संघ (Pakistan Team) आता भारतात दाखल झाला आहे. पाकिस्तानच्या संघात वेगवान गोलंदाज हसन अली (Hasan Ali) याला देखील संधी देण्यात आली आहे. वर्ल्ड कपच्या (World Cup) निमित्ताने पाकिस्तानी खेळाडूंचं कुटूंब देखील भारतात आलं आहे. हसन अलीची पत्नी (Hasan Ali Wife) आणि एअर एमिरेट्समधील फ्लाइट इंजिनिअर सामिया आरजू आपल्या मुलीसह हरियाणातील गुरुग्रामला पोहोचली. त्यावेळी हसन अली याच्या सासऱ्यांनी पहिल्यांदा नातीचं तोंड पाहिलंय.
सामिया आरजूचे आई-वडील, भाऊ आणि बहिणीसोबत गुरुग्राममधील फ्लॅटमध्ये राहत आहेत. घरातील सदस्य सामिया आरजूच्या परतण्याची आतुरतेने वाट पाहत होते. सामिया आरजूने पाकिस्तानी क्रिकेटर हसन अलीशी लग्न करून चार वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांना आता हेलेना हसन अली ही दोन वर्षांची मुलगी आहे. सामिया आरजू चार वर्षांनंतर भारतात परतली.
सामिया आरजूने 20 ऑगस्ट 2019 रोजी दुबईतील अटलांटिस पाम जुबेरा पार्क हॉटेलमध्ये पाकिस्तानी क्रिकेटर हसन अलीशी लग्न केले. त्याचे संपूर्ण कुटुंब नूह आणि गुरुग्राम येथून दुबईला गेले होते. लग्नानंतर ती भारतात येऊ शकली नाही. आता भारतात आल्यानंतर ती तिच्या मूळ गावीही जाऊ शकते, अशी माहिती अकबर अली यांनी दिली आहे. तर भारत पाकिस्तान सामना पाहण्यासाठी सर्व कुटूंब जाणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय.
हसन अलीचे सासरे गुरुग्राममध्ये ब्लॉक विकास आणि पंचायत अधिकारी (BDPO) आहेत. सामिया आरजूने मानव रचना विद्यापीठ, फरीदाबाद येथून एरोनॉटिकलमध्ये बीटेक केले आहे. माझी पहिली नोकरी जेट एअरवेजमध्ये होती. त्यानंतर त्यांना एअर एमिरेट्समध्ये अभियंता म्हणून नियुक्ती मिळाली, असं तिच्या भावानं सांगितलंय. सामिया आरजूच्या आजोबाचं पाकिस्तानमध्ये दुसरं कुटूंब आहे, त्यांच्याच नात्यातून सामिया अन् हसन अलीचं लग्न जुळलं होतं.