कँडी : श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारताचा ऑलराऊंडर क्रिकेटर हार्दिक पांड्याचा धमाका पाहायला मिळाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या दिवशीच्या सहा बाद ३२९ धावांवरुन खेळताना भारताचा पहिला डाव ४८७वर संपुष्टात आला. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रातील हार्दिकची खेळी सर्वेोत्तम ठरली. 


त्याने तुफानी शतक झळकावताना भारताला साडेचारशे इतकी सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. त्याने ८६ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकारांसह १०८ धावा ठोकल्या.


यासोबत त्याने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले. चहापानापर्यंत १०८ धावा ठोकणारा हार्दिक पंड्या पहिलाच भारतीय खेळाडू आहे. चहापानाच्या अगोदर पंड्याने शतक पूर्ण केलं होतं. याआधी वीरेंद्र सेहवागने वेस्ट इंडिजविरुद्ध २००६ साली चहापानापर्यंत ९९ धावा पूर्ण केल्या होत्या. तसेच पांड्याआधी चार भारतीय क्रिकेटर्सनी करिअरमधील पहिेले शतक कसोटी क्रिकेटमध्ये केले होते.