टीम इंडिय़ामध्ये पहिल्यांदा हे 2 भाऊ एकत्र खेळतांना दिसणार
![टीम इंडिय़ामध्ये पहिल्यांदा हे 2 भाऊ एकत्र खेळतांना दिसणार टीम इंडिय़ामध्ये पहिल्यांदा हे 2 भाऊ एकत्र खेळतांना दिसणार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2018/07/02/295311-632225-cricket-team-india-201801100318221.jpg?itok=Ew03dcsy)
हे 2 भाऊ पहिल्यांदाच एकाच जर्सीमध्ये खेळणार
मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियासाठी खेळाडूंची दुखापत डोकेदुखी ठरत आहे. अनेक खेळाडूंना दुखापतीमुळे टीममधून बाहेर बसावं लागत आहेत. पण याचा फायजा पंड्या भाऊंना होणार आहे. कारण वॉशिंगटन सुंदरच्या जागी आता भारतीय टीममध्ये टी20 सीरीजसाठी कृणाल पंड्याला संघात जागा मिळाली आहे. पहिल्यांदाच दोघे भाऊ टीम इंडियाकडून एकत्र खेळतांना दिसणार आहे. हार्दिक पंड्यानंतर त्याचा भाऊ कृणाल पंड्याला देखील भारतीय संघात जागा मिळाली आहे.
कृणाल पंड्याला वॉशिंगटन सुंदरच्या जागी संधी देण्यात आली आहे. सुंदर दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला. कृणालला जर टी20 टीममध्ये खेळण्याची संधी मिऴाली तर त्यांचं हे डेब्यू असेल आणि तो निळ्या जर्सीमध्ये खेळतांना दिसेल.
कृणाल पंड्या त्याच्या लहान भावाप्रमाणेच ऑल राउंडर आहे. पण हार्दिक फास्ट बॉलर आहे तर कृणाल स्पिनर आहे. दोघ भावांची एक खासियत आहे ती म्हणजे ते दोघेही आक्रमक आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये सामना फिरवण्याची कला त्या दोघांमध्ये आहे.