Anti-Sex beds in Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या रुममध्ये 'अँटी सेक्स बेड' ठेवले जाणार आहेत, असा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. खेळाडूंना अल्ट्रा लाईट बेड (Ultra-light cardboard beds) दिले जाणार आहेत. न्यूयॉर्क पोस्टने केलेल्या बातमीनुसार ऑलिम्पिक 2024 आधीच पॅरिसमध्ये अँटी सेक्स बेड आणण्यात आले आहेत. ऑलिम्पिकदरम्यान खेळाडूंच्या सेक्सुअल एक्ट‍िव‍िटी रोखणं हा यामागचा उद्देश असल्याचा दावा करण्यात आला आहे. या बेडचा आकार लहान असणार आहेत. ज्यामुळे एका बेडवर एकच खेळाडू झोपू शकेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बेडची निर्मिती एअरवेवने (Airweave) केली आहे. या कंपनीने टोकियो 2020 ऑलिम्पिकसाठीही असे बेड्स बनवले होते. अल्ट्र लाईट बेडचा पहिल्यांदा वापर टोकियो ऑलिम्पिकमध्ये करण्यात आला होता. त्यावेळी सुद्धा खेळाडूंच्या सेक्सुअल एक्टिव्हिटी रोखण्यासाठी असे बेड तयार करण्यात आल्याची चर्चा रंगली होती.


खरंच अँटी सेक्स बेड आहेत का?
पॅरिस ऑलम्पिकमध्ये आता पुन्हा एकदा अँटी सेक्स बेडची चर्चा रंगली आहे. खेळाडूंनी केवळ आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करावं यासाठी असे बेड बनवण्यात आल्याचं बोललं जातंय. टोकिया ऑलिम्पिकमध्ये धावपटू पॉल चेलिमो (Paul Chelimo)याने एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये त्याने खेळाडूंच्या रुममध्ये सेक्सुअल एक्टिव्हिटी रोखण्यासाठी अँटी सेक्स बेड लावण्यात आल्याचं म्हटलं होतं. लोकांनी पॉल चिलिमोच्या ट्विटवर विश्वास ठेवला आणि तेव्हापासून अँटी सेक्स बेडची चर्चा सुरु झाली.


ऑलिम्पिकदरम्यान अनेक अश्लिल प्रकार घडत असल्याचा गौप्यस्फोट एका खेळाडूने आपली ओळख लपवत केला होता. 2012 मध्ये लंडन ऑलम्पिकमध्ये  दोन महिलांबरोबर शारिरीक संबंध ठेवले होते, असंही या खेळाडूने सांगितलं होतं. 


ऑलिम्पिकमध्ये कार्डबोर्ड बेड का?
ऑलिम्पिकमध्ये अँटी सेक्स बेडबाबात एक रिपोर्ट समोर आला होता. यात फॅक्ट चेक करण्यात आला होता. अल्ट्र लाईट बेडचा उद्देश सेक्सुअल एक्टीव्हिटी रोखणं नसल्याचं सांगण्यात आलं. वास्तविक हे बेड पर्यावरणाचं नुकसान होत नाही. तसंच हे बेड पुन्हा वापरता येतात आणि आरामदायी असतात त्यामुळे असे बेड ठेवण्यात आल्याचंही फॅक्ट चेकमध्ये समोर आलं आहे. आयरिश जिमनॅस्ट राईस मॅक्लेनाघन यानेही हा दावा फेटाळून लावला आहे. 


जुलैमध्ये ऑलिम्पिक गेम्स
पॅरिस ऑलिम्पिक गेम्स 26 जुलै 2024 पासून सुरुवात होणार आहेत. 11 ऑगस्टला स्पर्धेचा समारोप होईल. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत जगभरातील जवळपास 10 हजार खेळाडू सहभागी होणार आहेत.