Dhyanchand Rejected Hitler Offer : खेळांचा महाकुंभ असलेल्या ऑलिम्पिकसाठी (Paris Olympics 2024) आता जगभरातून खेळाडू संपूर्ण तयारी करून पॅरिसला पोहोचले आहेत. भारतानं पॅरिस ऑलिम्पिकसाठी 117 खेळाडू रवाना झाले आहेत. त्यामुळे भारतीय खेळाडू यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये किमान डझनभर पदकं जिंकतील, असा विश्वास व्यक्त केला जातोय. 2021 मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला केवळ 7 पदकं जिंकता आली होती. मात्र, पॅरिस ऑलिम्पिक भारताची लकी ठरण्याची शक्यता आहे. ऑलिम्पिक म्हटलं की, एक गोष्ट नेहमी सांगितली जाते.. ती म्हणजे हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांची...


नेमका किस्सा काय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेजर ध्यानचंद म्हणजे भारतासाठी हॉकीचा सुवर्णकाळ... त्यांनी ऑलिम्पिक गेममध्ये सुवर्णपदकं जिंकून दिली आहेत. यामध्ये 1936 ची ऑलिम्पिक खास होती. त्याला कारण देखील खास होतं. भारत स्वातंत्र्य होण्याच्या 11 वर्षाआधी म्हणजेच 15 ऑगस्ट याच दिवशी हुकूमशहा हिटलरसमोर ध्यानचंद यांनी असा काही गेम पलटवला की, हिटलर देखील बघतच राहिला. या सामन्यात भारताने म्हणजे त्यावेळत्या ब्रिटिश इंडियाने ध्यानचंद यांच्या नेतृत्वात जर्मनीचा 8-1 ने पराभव केला होता.


तर झालं असं की, सामना खेळवला जाणार होता हा 14 ऑगस्टला... मात्र, पावसामुळे सामना खेळवण्यात आला तो 15 ऑगस्ट रोजी. फायनल सामन्यात आमने सामने होते... भारत आणि जर्मनी. सामना सुरू झाला. जर्मनीने आक्रमण सुरू केलं अन् पहिल्याच हाफमध्ये जर्मनीने एक गोल करत 1-0 ची आघाडी घेतली. आता दुसऱ्या हाफमध्ये जादू दाखवण्याची गरज होती. त्यावेळी मैदानात चिकचिक होतीच. ध्यानचंद यांनी त्यावेळी बुट न घातला खेळण्याचा निर्णय घेतला. बुट न घातला ते मैदानात उतरले अन् वाऱ्याच्या वेगाने पळू लागले. अशक्य वाटणारा सामना भारताने 8-1 च्या फरकाने जिंकला. ध्यानचंद यांचा हा खेळ पाहून खुद्द हिटलर देखील आवाक् झाला. पदक देताना हिटलरने ध्यानचंद यांची खास भेट घेतली आणि त्यांना जर्मनीकडून खेळण्याची ऑफर दिली. तुम्हाला आम्ही मिलिट्रीमधील सर्वोच्च सन्मान देऊ, असं हिटलर म्हणाला. पण ध्यानचंद यांच्या देशभक्तीसमोर हिटलरचा टिकाव लागला नाही.


भारताच्या या विजयानंतर हिटलरने सर्वांनी जंगी पार्टी दिली. मात्र, या पार्टीला ध्यानचंद यांनी हजेरी लावली नाही. त्याऐवजी ते मैदानात बसले होते. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहून एका सहकाऱ्याने विचारलं. एवढा मोठा सामना जिंकल्यानंतर डोळ्यात पाणी का? त्यावेळी त्यांनी सांगितलं. आज युनियन जॅकच्या जागी आपला तिरंगा असता तर मला आनंद झाला असता. ध्यानचंद यांनी अॅमस्टरडॅम 1928 आणि लान्स ऍजाइल 1932 ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर त्यांनी तिसरं गोल्ड मेडल मिळवून दिलं होतं.


दरम्यान, मेजर ध्यानचंद हे बर्लिन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचे कर्णधार होते. भारताला सलग तीन ऑलिम्पिक गेममध्ये त्यांनी विजय मिळवून दिला होता. त्यांनी देशांतर्गत खेळात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आत्तापर्यंत 1000 हून अधिक गोल केले आहेत. त्यांचा हा रेकॉर्ड मोडणं अजूनही कोणाला जमलं नाही.