Paris Olympics 2024, Swapnil Kusale Family Reaction : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्निल कुसाळेनं 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात ब्रॉन्झ मेडल पटकावलंय. या स्पर्धेत स्वप्निलनं एकूण 451.4 गुण प्राप्त केले. भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधील हे तिसरं मेडल आहे. स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूरमधल्या कांबळवाडी गावातील आहे. स्वप्निल कुसाळे 2012 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. आता 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर स्वप्नील कुसाळेनं ऑलिम्पिकमध्ये मेडल पटकावलंय. 1952 नंतर महाराष्ट्राला वैयक्तिक प्रकारात दुसरं मेडल मिळाल्याने आता आनंद व्यक्त केला जात आहे. अशातच आता स्वप्निलच्या आईवडिलांना भावना अनावर झाल्या.


स्वप्निलच्या विजयानंतर कुटूंबाची प्रतिक्रिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मला खात्री होती की, गेल्या 12 वर्षांची त्याची मेहनत कमी पडणार नाही. आपला तिरंगा कधीही खाली पडून देणार नव्हता, याची मला खात्री होती. मला त्याचा अभिमना वाटतो, असं स्वप्नीलचे वडिल म्हणाले. आपला झेंडा त्याने फडकवला याचा मला गर्व वाटतो, असं स्वप्निलच्या आईने म्हटलं आहे. त्यावेळी स्वप्निलच्या आईला भावना अनावर झाल्या अन् डोळ्यात पाणी आलं. माझ्या भावाने खूप कष्ट घेतले, त्यामुळे मला त्याचा अभिमान आहे, असं स्वप्निलचा भाऊ म्हणाला.


गेल्या 14 ते 15 वर्ष आम्ही तपश्चर्या केली, ते आम्ही शब्दात मांडू शकत नाही. पण त्याहून जास्त त्याचं कष्ट देखील जास्त आहे. त्याच्या यशामागे दिपाली देशपांडे यांचं खूप महत्त्व आहे. मॅच बघताना  आमच्या डोळ्यात पाणी आलं होतं. स्वप्निलने गावाचं, जिल्ह्याचं आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठं केलं, असं स्वप्निलचे वडील सुरेश कुसळे म्हणाले. 


स्वप्निलच्या आजीने देखील यावर प्रतिक्रिया दिली. आजीला नातवाच्या कामगिरीतं अप्रुप वाटलं. स्वप्निलनं करुन दावलं... लय चांगलं झालं, आमचा आशीर्वाद हाय त्याला.. आता इकडं आला की त्याचा मुका घेणार, असं स्वप्निलच्या आजीने म्हटलं आहे. आजीच्या चेहऱ्यावर दिसत असलेलं सुख सर्वकाही सांगत होतं.



दरम्यान, स्वप्निलने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरं पदर मिळवून दिलं आहे तर महाराष्ट्राला पहिलं पदक मिळवून दिलं आहे. महाराष्ट्रात ऑलिम्पिक मेडल येण्यासाठी तब्बल 72 वर्षे लागली. पैलवान खाशाबा जाधव यांनी 1952 मधील समर ऑलिंपिक स्पर्धेत कुस्तीत ब्राँझ पदक पटकावले होते.