क्रीडा लवादाने याचिका फेटळाल्यानंतर विनेश फोगटाची पहिली पोस्ट, क्रीडा चाहते भावूक
Vinesh Phogat Petition Dismissed : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटनला अपात्र ठरवल्यानंतर तिने या निर्णयाविरोधात क्रीडा लवादाकडे याचिका केली होती. पण ही याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर आता विनेश फोगाटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
Vinesh Phogat Petition Dismissed : भारतातल्या करोडो क्रीडा चाहत्यांना पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये मोठा धक्का बसला. कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टस (CAS) अर्थात क्रीडा लवादाने भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटची (Vinesh Phogat) याचिका फेटाळून लावली. ऑलिम्पिक संघनेच्या विरोधात विनेशने याचिका केली होती. याचिका फेटाळल्याने विनेशची रौप्य पदक (Silver Medal) मिळवण्याची आशाही संपुष्टात आली आहे. क्रीडा लवादाच्या निर्णयानंतर आता पहिल्यांदाच विनेश फोगाटने सोशल मीडिआलर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर दिग्गजांबरोबरच अनेक क्रीडा चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
विनेश फोगाटची पोस्ट
विनेश फोगाटने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत विनेश हतबल असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे या फोटोसोबत तीने कोणताही कॅप्शन लिहिलेला नाही. पण फोटोच विनेशच्या भावना व्यक्त करतोय. या फोटोवर दिग्गजांसोबत अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. भारतीय टेबल टेनिस खेळाडू मोनिका बत्राने तू प्रेरणादायी आहात, कौतुकास पात्र आहेस आणि भारताचे रत्न आहेस' असं म्हटलं आहे. मोनिका बरोबरच अनेकांनी विनेशला पाठिंबा दर्शवला आहे.
विनेशची याचिका फेटाळली
विनेश फोगाटने क्रीडा लवादाकडे रौप्य पदकासाठी याचिका केली होती. आधी क्रीडा लवादाने पॅरिस ऑलिम्पिकच्या अखेरच्या दिवशी म्हणजे 11ऑगस्टला निर्णय देणार असल्याचं सांगितलं. पण त्यानंतर तारीख पे तारीख देत राहिले. अखेर चौदा तारखेला याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला. पण विनेशची याचिका फेटाळण्यात आली. 50 किलो वजनी गटात विनेश फोगाटने अंतिम फेरीत धडक मारली. पण अंतिम फेरीच्या आधी करण्यात आलेल्या वैद्यकीय चाचणीत विनेशचं वजन 100 ग्राम अधिक दाखवण्यात आलं. यामुळे ऑलिम्पिक संघटनेने तिला अपात्र ठरवलं.
विनेशची निवृत्ती
ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरवण्यात आल्यानंतर विनेश फोगाटने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (IOA) अध्यक्षा डॉ पीटी उषा यांनी क्रीडा लवादाच्या निर्णयावर धक्का आणि निराशा व्यक्त केली. विनेशच्या पाठीशी आहोत आणि कायदेशीर पर्याय शोधले जात आहेत, असं पी टी उषा यांनी म्हटलंय.
विनेश फोगाटने कॉमनवेल्थ गेम्सम्ये तीन सुव्रम पदकं जिंकली आहेत. 2014, 2018 आणि 2022 मध्ये तीने ही कामगिरी केली. याशिवाय एशियन गेम्स 2018 मध्येही तीने सुवर्णपदक पटकावलं होतं. दरम्यान विनेशच्या समर्थनार्थ कुस्तीपटू बजरंग पुनियाने एक कविता शेअर केली असून ती सध्या चर्चेचा विषय ठऱलीय.