Paralympic 2024: सध्या पॅरिस पॅरालिम्पिक सुरू आहेत. पण सुरूवातीच्या 6 दिवसात भारताला पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये काही खास यश मिळाले नाही. पण 3 सप्टेंबरला रात्री भारताने कांस्य पदक मिळवून त्या दिवशीचे आपले खाते उघडले. दीप्ती जीवनजी हिने महिलांच्या 400 मीटर टी 20 शर्यतीत 55.82 सेकंदानी तिसऱ्या क्रमांकावर विजयी होऊन भारताला कांस्य पदक मिळवून दिले. पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताला मिळालेले हे सोळावे पदक आहे. 20 व्या वर्षात ट्रॅक अॅंड फिल्डमध्ये भारताला पदक मिळवून जिंकवून देणारी युवा खेळाडू ठरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलांच्या T20 400 मीटर फायनलमध्ये दीप्ती जीवनजी भारताला सुवर्ण पदक मिळवून देईल अशी सगळ्यांनाच आशा होती. कारण त्यादिवशी पर्यंत या स्पर्धेतील वर्ल्ड रेकॉर्ड दीप्तीच्या नावावर होता. पण 3 सप्टेंबरला टर्कीच्या एसेल ओंडरने 54.96 सेकंदात ही धाव पूर्ण करून नवीन रोकॉर्ड नोंदवला. मागील दोन वर्षांतही दीप्तीने घवघवीत यश संपादन करून भारताची मान अभिमानाने उंचावली होती. 2023 च्या आशियाई स्पर्धेत तिला आशियाई रेकॉर्ड मिळवून सुवर्ण पदक जिंकले होते. याचबरोबर 2024 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही तिने वर्ल्ड रेकॉर्ड मोडून सुवर्ण पदक पटकावले होते. त्यामुळे दीप्तीकडून भारताला पुन्हा एकदा सुवर्ण पदकाची अपेक्षा होती. मात्र यावेळी तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. युक्रेनच्या वाय. शुलियारने 55.16 सेकंदमध्ये सुवर्ण पदक आणि तुर्कस्तानच्या ऑन्डरने 55.23 सेकंदात धाव पूर्ण करत रौप्यपदक जिंकले. 


 


दीप्तीचा आजपर्यंतचा प्रवास


दीप्ती जीवनजीचा जन्म तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील कल्लेडा गावात झाला. दीप्तीची आई धनलक्ष्मी जीवनजी आणि वडील यादगिरी जीवनजी हे शेतकरी आहेत. त्यांच्याकडे दीड एकर शेतजमीन होती आणि ते दोघं इतरांच्या शेतात रोजंदारीवर मजूर म्हणूनही काम करायचे. दीप्तीला पुलेला गोपीचंद यांचाही पाठिंबा मिळाला. त्यांनी हैदराबाद मधील बौद्धिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय संस्थेत तिची चाचणी घेण्याचे सुचवले. आणि यानंतर ती पॅरा खेळाडू म्हणून स्पर्धेत भाग घेऊ लागली.


हेही वाचा : सचिन .. सचिन..! महाराष्ट्राच्या सुपुत्रानं पॅरालिम्पिकमध्ये रचला इतिहास, 40 वर्षांनी पहिल्यांदा जिंकलं पदक


 


भारताकडून यंदा पॅरालिम्पिकमध्ये 84 खेळाडूंचा सहभाग : 


पॅरिस पॅरालिम्पिक 2024 साठी भारताने यंदा 84 खेळाडूंचा समूह पाठवला आहे. हे खेळाडू विविध प्रकारच्या 12 स्पर्धांमध्ये भाग घेणार आहेत. 84 खेळांडून पैकी यात 52 पुरुष तर 32 महिला खेळाडूंचा समावेश आहे. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 स्पर्धेची सांगता 9 सप्टेंबरला होईल.