पॅट कमिन्स ठरला आयपीएल इतिहासातील दुसरा महागडा खेळाडू, लागली `इतक्या` कोटींची बोली!
Most Expensive Players in IPL: पॅट कमिन्स (Pat Cummins) हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. 20.50 कोटींमध्ये त्याला हैदराबादने आपल्या संघात सहभागी केलं आहे.
IPL 2024 Auction Pat Cummins Sold to SRH: आयपीएल इतिहासातील दुसरी सर्वात मोठी बोली लागली (Highest bid in IPL history) आहे. ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कॅप्टन पॅट कमिन्स याच्यावर सनराईझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) पैश्यांची उधळण केली आहे. हैदराबादने तब्बल 20 कोटी 50 लाखात पॅट कमिन्सला संघात सामावून घेतलं आहे. त्यामुळे आता हैदराबादला नवा कॅप्टन (Pat Cummins) मिळालाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याची बेस प्राईज 2 कोटी होती. पॅट कमिन्सला संघात समील करून घेण्यासाठी हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू यांच्यात त्याला घेण्यासाठी चुरस रंगली होती, शेवटला आरसीबी आणि हैदराबादने उडी घेतली. बराचवेळ दोन्ही फँचायझीमध्ये बराच वेळ भिडत पहायला मिळाली. अखेर हैदराबादने त्याला 20 कोटी 50 लाख रूपयांना खरेदी केलं आहे.
हैदराबादने ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर डाव लावल्याचं पहायला मिळतंय. ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या ट्रॅव्हिस हेड याला हैदराबाद संघाने आपल्यात ताफ्यात सामील करून घेतलंय. ट्रॅव्हिस हेड याची बेस प्राईज 2 कोटी होती. चेन्नई आणि हैदराबाद यांच्यातील लढतीनंतर हैदराबाद संघाने त्याला 6 कोटी 80 लाख रूपयांना खरेदी केलंय.
हैदराबादला मिळाला हुकमी एक्का
सनरायझर्स हैदराबादने श्रीलंकेचा स्टार स्पिनर वानिंदू हसरंगा याच्यावर देखील दाव लावला असून 1.5 कोटींना त्याला खरेदी केलं आहे.