मुंबईला मोठा धक्का, हा खेळाडू संघातून बाहेर
मुंबईला आणखी एक धक्का
मुंबई : मुंबईच्या वानखेडेवर झालेल्या पहिल्या सामन्यात चेन्नईकडून पराभूत झाल्यानंतर मुंबईला आणखी एक धक्का बसला आहे. मुंबईचा फास्ट बॉलर दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. पहिल्या सामना गमावल्यानंतर मुंबई संघातून आणखी एक फास्ट बॉलर बाहेर जाणं मुंबईसाठी नक्कीच चिंताजनक आहे. ड्वेन ब्रावोने पहिल्या सामन्यात तुफानी फलंदाजी करत मुंबईला पराभवाचा धक्का दिला होता. मुंबईच्या चांगले बॉलर देखील त्याच्यासमोर चांगली कामगिरी करु शकले नव्हते. त्यामुळे आणखी एक चांगला बॉलर संघाबाहेर पडल्याने त्यांच्या चिंता आणखी वाढल्या आहे.
ऑस्ट्रेलियाचा बॉलर पॅट कमिन्स दुखापतीमुळं टुर्नामेंटमधून बाहेर झाला आहे. पॅट कमिन्स बाहेर गेल्यामुळे मुंबईच्या चिंता वाढल्या आहेत. मुंबईने 2 कोटींच्या पॅट कमिन्सला 5.6 कोटींना विकत घेतलं होतं. कंबरेला दुखापत झाल्याने त्याला बाहेर जावं लागलं आहे. डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
दक्षिण आफ्रिकविरोधात झालेल्या कसोटी आणि टी-20 सामन्यात पॅट कमिन्सने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याच्यावर अधिक पैसे लावून मुंबईने त्याला संघात घेतलं होतं. पॅट कमिन्स गेल्या वर्षी दिल्ली संघातून खेळत होता. पहिल्या सामन्यात देखील पाठीच्या दुखपतीमुळं तो संघातून बाहेर होता. पण आता तो संघातून बाहेर झाला आहे. त्याची जबाबदारी आता जसप्रीत बुमरा, मुस्ताफिझूर रेहमान, बेन कटिंग, मिचेल मॅक्लेघन यांच्यावर असणार आहे.